शिवजयंतीच्या पावतीची रक्कम न दिल्याने मारहाण

By Admin | Updated: February 9, 2016 23:53 IST2016-02-09T23:50:01+5:302016-02-09T23:53:57+5:30

शिवजयंतीच्या पावतीची रक्कम न दिल्याने मारहाण

Shivajiaye did not pay the receipt of the money | शिवजयंतीच्या पावतीची रक्कम न दिल्याने मारहाण

शिवजयंतीच्या पावतीची रक्कम न दिल्याने मारहाण

सिन्नर : शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी ७ हजार रुपयांची पावती न दिल्याने कारखान्यातील हमालास मारहाण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी दिली. माळेगाव औद्योगिक वसाहतीतील नोबेल हायजिंग कारखान्यात हमाली काम करणाऱ्या पांडुरंग कुऱ्हाडे, रा. भोकणी याने फिर्याद दिली़ सिन्नर येथील व्ही राजे गु्रप या बहुउद्देशीय संस्थेचे पप्पू ऊर्फ मोहन उगले, सुजीत गिते, शैलेश उगले, राजेंद्र चव्हाणके, दीपक ताजनपुरे व सुनील खोळंबे यांनी नोबेल हायजिंग कारखान्याच्या गोडावूनमध्ये फिर्यादी कुऱ्हाडे याला शिवजयंती उत्सवाची पावती न दिल्याने त्यास संशयित आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (वार्ताहर)

Web Title: Shivajiaye did not pay the receipt of the money