शिवाजी सहाणे  की नरेंद्र दराडे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 01:14 AM2018-05-24T01:14:28+5:302018-05-24T01:14:28+5:30

 Shivaji Sahane's Narendra Darade? | शिवाजी सहाणे  की नरेंद्र दराडे?

शिवाजी सहाणे  की नरेंद्र दराडे?

Next

नाशिक : नाट्यमय घटनांनी गाजलेल्या विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी सकाळी करण्यात येणार असून, शिवाजी सहाणे यांच्या विजयाने राष्टÑवादी मतदारसंघ राखतो, की शिवसेनेचे नरेंद्र दराडे हा मतदारसंघ खेचून आणतात याचा फैसला करणाऱ्या या निवडणुकीचा निकाल सकाळी १० वाजेपर्यंत घोषित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून, कायदा व सुव्यवस्थेचा विचार करता मतमोजणी केंद्रावर व्यापक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  विधान परिषदेच्या या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसने शिवाजी सहाणे यांना उमेदवारी जाहीर केली. राष्टवादीला कॉँग्रेस व महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने पाठिंबा जाहीर केला होता, तर शिवसेनेने जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांची उमेदवारी जाहीर केली होती. भारतीय जनता पक्षाच्या भरवशावर जिल्हा विकास आघाडीच्या वतीने परवेज कोकणी यांनीही या निवडणुकीत नामांकन दाखल केले होते. तथापि, भाजपाने कोकणी यांना जाहीर पाठिंबा देण्याचे टाळत भाजपाच्या मतदारांना निवडणुकीच्या आदल्या दिवसापर्यंत संभ्रमित ठेवले. त्यामुळे भाजपाच्या पाठिंब्याची सेनेच्या दराडे यांना जशी आशा होती, तशीच आशा कोकणी यांनी बाळगली होती. परंतु अखेरच्या क्षणी भाजपाने राष्टÑवादी कॉँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. भाजपाकडून झालेल्या या फसवणुकीमुळे निराश झालेल्या परवेज कोकणी यांनी स्वत:ची उमेदवारी मागे घेत मतदानाच्या दिवशी शिवसेनेला मदत केली. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून, दराडे व सहाणे या दोघांनीही विजयाचा दावा केला आहे. सोमवारी या निवडणुकीसाठी जिल्ह्णाच्या १५ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. त्यावेळी ६४४ मतदारांनी शंभर टक्के मतदानाचा हक्क बजावला. एकेक मत लाख मोलाचे असलेल्या या निवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार झाल्याची चर्चाही रंगली होती.

Web Title:  Shivaji Sahane's Narendra Darade?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.