शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीत प्रवेश करताना क्षणीच शिवाजी सहाणे यांना उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 18:03 IST

नाशिक विधान परिषदेच्या नाशिक जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांना बुधवारी (दि.२) अधिकृतरीत्या उमेदवारी घोषित करण्यात आली

ठळक मुद्देअ‍ॅड. शिवाजी सहाणे यांची अलीकडेच शिवसेनेने हकालपट्टी केली होती.शिवसेनेच्या वतीने जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना उमेदवारी

नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांना बुधवारी (दि.२) अधिकृतरीत्या उमेदवारी घोषित करण्यात आली असून, त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. येत्या २१ मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे या उभयतांत आता सामना रंगणार आहे.अ‍ॅड. शिवाजी सहाणे हे शिवसेनेचे माजी नगरसेवक असून, गेल्यावेळी त्यांनी विधान परिषदेची निवडणूक राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांच्या विरोधात लढवली होती त्यात समसमान मते झाल्याने चिठ्ठी पद्धतीने त्यांच्या विरोधात कौल गेला होता, त्यानंतर पुन्हा विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून दावेदारी करणा-या अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांची अलीकडेच शिवसेनेने हकालपट्टी केली होती. शिवसेनेच्या वतीने नरेंद्र दराडे यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे कळाल्यानंतर अ‍ॅड. शहाणे यांनी नाराजी तर व्यक्त केली शिवाय स्वत:ची उमेदवारी घोषित करून भेटीगाठी सुरू केल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेने स्वयंघोषित उमेदवारी केल्याचा ठपका ठेवत पक्षातून हकालपट्टी केली होती. त्यानंतर राष्टÑवादीच्या संपर्कात ते गेले आणि त्याचवेळी राष्टÑवादीनेदेखील त्यांना जवळ केले. बुधवारी (दि. २) सकाळी राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे नाशिकमध्ये आल्यानंतर अ‍ॅड. सहाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांना तत्काळ उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. विशेष म्हणजे अ‍ॅड. शिवाजी सहाणे यांचा अर्ज दाखल करतेवेळी सध्या राष्टÑवादीच्या वाटेवर असलेले भाजपाचे शिक्षक मतदारसंघातील आमदार डॉ. अपूर्व हिर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पगार, आमदार जयंत जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटील