चुरशीच्या निवडणुकीत शिवाजी नाठे विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 01:32 IST2021-01-19T23:09:30+5:302021-01-20T01:32:16+5:30

जानोरी : कुर्णोली(ता.दिंडोरी)-येथील ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन करून एकूण ७ जागांपैकी सहा जागांसाठी बिनविरोध निवड केली.

Shivaji Nathe won the election of Churshi | चुरशीच्या निवडणुकीत शिवाजी नाठे विजयी

कुर्णोली येथील बिनविरोध उमेदवारांसह निवडून आलेले शिवाजी नाठे. व इतर उमेदवार.

ठळक मुद्देदत्तात्रय संधान यांना ८८ मते मिळवून त्यांना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले .



जानोरी : कुर्णोली (ता.दिंडोरी) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन करून एकूण ७ जागांपैकी सहा जागांसाठी बिनविरोध निवड केली. यामध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये -सुरेखा झोमान, मोतीराम गवळी,प्रभाग दोन पुष्पा लहांगे व ललित पोटींदे,प्रभाग तीन मध्ये तीन जागा असल्याने दोन जागा रोहिणी नाठे व इंदू वाघमारे या बिनविरोध निवड झाली होती. प्रभाग तीन मध्ये सर्वसाधारण एका जागेसाठी माजी पोलीस पाटील शिवाजी नाठे तर निवृत्त माध्यमिक शिक्षक दत्तात्रय संधान यांच्यात चुरशीची लढत होऊन त्यात माजी पोलीस पाटील शिवाजी नाठे हे २६५ मते मिळवून विजयी झाले. दत्तात्रय संधान यांना ८८ मते मिळवून त्यांना निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले .

(१९ जानोरी)

Web Title: Shivaji Nathe won the election of Churshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.