मडकीजांब येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:57 IST2018-06-07T00:57:28+5:302018-06-07T00:57:28+5:30
दिंडोरी : तालुक्यातील मडकीजांब येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हनुमान मंदिराच्या सभागृहात झालेल्या कार्यक्र माच्या प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास मंत्रोच्चारासह दुग्धाभिषेक करण्यात आला.

मडकीजांब येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात
दिंडोरी : तालुक्यातील मडकीजांब येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हनुमान मंदिराच्या सभागृहात झालेल्या कार्यक्र माच्या प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास मंत्रोच्चारासह दुग्धाभिषेक करण्यात आला.
शिवरायांच्या नामाचा जयघोष करण्यात आला. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी इतिहासाचे अभ्यासक व प्रमुख वक्ते रघुनाथ जगताप यांनी शिवराज्याभिषेकप्रसंगाचे उत्कृष्ट शैलीत वर्णन केले. यावेळी सिद्धेश्वर मित्रमंडळाचे संस्थापक सचिन वडजे यांनीही मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन सुदर्शन बोराडे यांनी केले. कार्यक्र मासाठी उपसरपंच बाकेराव बोराडे, माजी ग्रा.प.सदस्य विलास वडजे, बाळासाहेब धुमणे, जितेंद्र वडजे, निवृत्ती बोराडे, जेष्ठ नागरीक रामभाऊ धुमणे, प्रभाकर वडजे, मोहन वडजे, विलास वडजे, बाबुराव जगताप, राकेश जाधव, श्रीकांत धुमणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.