शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

शिवप्रेमींमध्ये जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 11:16 PM

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा, चांदवड, मनमाड, नांदगाव आदी ठिकाणी अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, प्रतिमापूजन करण्यात आले. देवळ्यात सादर केलेले लेजीम पथक आकर्षण ठरले. उमराणेत कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शिवमुद्रा असलेल्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. नांदगाव येथे आमदार सुहास कांदे यांनी दुचाकी रॅलीत सहभाग घेतला.

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यातील कळवण, सटाणा, देवळा, चांदवड, मनमाड, नांदगाव आदी ठिकाणी अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, प्रतिमापूजन करण्यात आले. देवळ्यात सादर केलेले लेजीम पथक आकर्षण ठरले. उमराणेत कृषीमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शिवमुद्रा असलेल्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. नांदगाव येथे आमदार सुहास कांदे यांनी दुचाकी रॅलीत सहभाग घेतला.चांदवड नगर परिषद कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नगराध्यक्ष रेखा गवळी यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. कांतिलाल बाफना व माधवराव पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याबाबत माहिती दिली, तर बाळासाहेब वाघ यांनी आभार मानले. यावेळी उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, कविता उगले, शालिनी भालेराव, बाळू वाघ, इंदूबाई वाघ, अ‍ॅड. नवनाथ आहेर, अशपाक खान, जगन्नाथ राऊत, अल्ताफ तांबोळी, सुनीता पवार, मीनाताई कोतवाल आदी उपस्थित होते.चांदवड अध्यापक विद्यालययेथील लीलाबाई दलूभाऊ जैन अध्यापक विद्यालयात प्रारंभी प्रतिमा पूजन झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य धनंजय मोरे होते. शिवजयंतीनिमित्त प्रश्नमंजूषा व वर्क्तृत्व स्पर्धा घेण्यात आली.प्रश्नमंजूषा स्पर्धेत वैष्णवी कोतवाल प्रथम, किरण घोरतळे द्वितीय, अश्विनी उशीर तृतीय तसेच वर्क्तृत्व स्पर्धेत कोमल सोनवणे प्रथम, पूजा गांगुर्डे द्वितीय, सोनाली साठे व अक्षय जाधव तृतीय क्रमांक मिळवून यशस्वी झाले. सूत्रसंचालन अक्षय जाधव व किरण घोरतळे याने केले.नेमिनाथ जैन शाळायेथील नेमिनाथ जैन प्राथमिक शाळेत अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जयश्री गोळेचा होत्या. विद्यार्थ्यांनी पोवाडे, शिवरायांची गाणी सादर केली. विद्यार्थ्यांनी शिवरायांची व जिजामातेची वेशभूषा करून भाषणे केली. सूत्रसंचालन किरण कुवर यांनी केले. शिक्षक प्रतिनिधी म्हणून योगेश फुलदेवरे यांनी शिवरायांच्या चरित्राबद्दल माहिती सांगितली.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज