येवल्यात शिवसेनेची तीन जागांवर बाजी

By Admin | Updated: February 24, 2017 00:38 IST2017-02-24T00:37:50+5:302017-02-24T00:38:01+5:30

विजयी मिरवणूक : राष्ट्रवादीला दोन जागा मिळविण्यात यश

Shiv Sena's three seats in Yeola | येवल्यात शिवसेनेची तीन जागांवर बाजी

येवल्यात शिवसेनेची तीन जागांवर बाजी

येवला : तालुक्यात अत्यंत चुरशीच्या झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेला तीन, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसला दोन जागा मिळविण्यात यश मिळाले.
राजापूर जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या सुरेखा नरेंद्र दराडे यांनी विजय मिळविला. त्यांनी राष्ट्रवादीच्या शकुंतला सोनवणे, राष्ट्रीय कॉँग्रेसच्या भारती पुणे, भाजपाच्या देविता आवारे, अपक्ष रेन्ना तांबोळी यांना पराभूत केले. अंदरसूल जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीचे महेंद्रकुमार काले विजय झाले. त्यांनी मकरंद सोनवणे (शिवसेना), बाबासाहेब डमाळे (भाजपा), रावसाहेब लासुरे (कॉँग्रेस) यांचा पराभव केला.
मुखेड जिल्हा परिषद गटातून शिवसेनेच्या कमल आहेर यांनी विजय संपादन केला. त्यांनी कुसुम कृष्णराव गुंड (राष्ट्रवादी)े, सुरेखा कदम (भाजपा), संगीता आहेर (कॉँग्रेस) यांचा पराभव केला.
पाटोदा गणातून सुनीता मेंगाणे (राष्ट्रवादी) यांनी विजय मिळविला. त्यांनी जयश्री बोरणारे (शिवसेना), अलका कुऱ्हाडे, आशालता पाटील (कॉँग्रेस), अर्चना गिते यांचा पराभव केला. धुळगाव गणातून मोहन खंडू शेलार (राष्ट्रवादी) यांनी विजय मिळवला. त्यांनी शिवसेनेचे नवनाथ खोडके, सूर्यकांत गोसावी, विक्रांत गायकवाड (बसपा), बाबासाहेब पवार (अपक्ष) यांचा पराभव केला.
सायगाव गणात रूपचंद भागवत (शिवसेना) विजयी झाले.
त्यांनी राहुल भालेराव (राष्ट्रवादी), गोरखनाथ खैरनार (भाजपा), तान्हुबाई गायकवाड (बसपा) यांचा पराभव केला. अंदरसूल गणातून नम्रता जगताप (शिवसेना) विजयी
झाल्या. त्यांनी स्वाती सोनवणे (राष्ट्रवादी), सखाहरी लासुरे (भाजपा), शिवाजी धनगे (कॉँग्रेस) यांचा पराभव केला. (वार्ताहर)

Web Title: Shiv Sena's three seats in Yeola