सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या सुमन बर्डे बिनविरोध
By Admin | Updated: March 14, 2017 17:07 IST2017-03-14T17:07:07+5:302017-03-14T17:07:19+5:30
सिन्नर : सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या सौ. सुमन राजाराम बर्डे तर उपसभापतिपदी सौ. वेणूबाई अशोक डावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या सुमन बर्डे बिनविरोध
सिन्नर : सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या सौ. सुमन राजाराम बर्डे तर उपसभापतिपदी सौ. वेणूबाई अशोक डावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तहसीलदार तथा पिठासन अधिकारी मनोजकुमार खैरनार यांच्या अध्यक्षेतखाली सकाळी ११ वाजता सभापती व उपसभापती निवडणुकीच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला. निर्धारित वेळेत शिवसेनेच्या सौ. सुमन बर्डे यांनी सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावर सूचक म्हणून रोहिणी कांगणे व भगवान पथवे यांची स्वाक्षरी होती. उपसभापतिपदासाठी शिवसेनेच्या सौ. वेणूबाई डावरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर सूचक म्हणून संग्राम कातकाडे व संगिता पावसे यांची स्वाक्षरी होती.
निर्धारित वेळेत सभापतिपदासाठी सौ. बर्डे व उपसभापतिपदासाठी सौ. डावरे यांचा प्रत्येकी एक अर्ज आल्याने बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक अधिकारी खैरनार यांनी केली. निवडणूक प्रक्रियेत नायब तहसीलदार प्रशांत पाटील व गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले.
बैठकीस शिवसेनेचे गटनेते संग्राम कातकाडे, पंचायत समिती सदस्य जगन्नाथ भाबड, भगवान पथवे, सौ. शोभा बर्के, संगिता पावसे, रोहिणी कांगणे यांच्यासह भाजपाचे गटनेते विजय गडाख, रवींद्र पगार, तातू जगताप, सौ. योगिता कांदळकर उपस्थित होते.