शेतकरी कर्ज विलंबाबाबत बँक अधिकाऱ्यांना शिवसेनेचे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2021 00:01 IST2021-11-09T00:01:34+5:302021-11-09T00:01:59+5:30
मनमाड : येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणास विलंब होत असल्याने याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली व बँक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

शेतकरी कर्ज विलंबाबाबत बँक अधिकाऱ्यांना शिवसेनेचे निवेदन
मनमाड : येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणास विलंब होत असल्याने याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली व बँक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
येथील स्टेट बँकेत शेतकऱ्यांच्या कर्जास उशीर होत असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या. शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणाच्या फाइलींचा तत्काळ निपटारा करण्याची मागणी शिवसौनिकांनी केली. यासंदर्भात कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन बँक अधिकाऱ्यांनी दिले आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, सुनील पाटील, शहरप्रमुख मयूर बोरसे, उपशहरप्रमुख जाफर मिर्झा, संतोष जगताप, सुभाष माळवतकर, दिनेश केकाण, योगेश इमले, सोनू पोहाल, दिनेश घुगे, मुकुंद झालटे, तुषार गोयल, नितीन गवळी, पंडित सानप, मिलिंद पाथरकर, स्वप्नील सांगळे, महेंद्र गरुड, नीलेश ताठे, राजाभाऊ धोंडगे, सचिन दरगुडे, अजिंक्य साळी आदीं उपस्थित होते.