नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा
By Admin | Updated: March 21, 2017 15:25 IST2017-03-21T14:18:13+5:302017-03-21T15:25:21+5:30
अध्यक्षपदी शीतल सांगळे तर उपाध्यक्षपदी कॉँग्रेसच्या नयना गावित

नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा
नाशिक : येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणूकीत शिवसेना, कॉँग्रेस व माकप अशी युती पहावयास मिळाली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या युवा उमेदवार शीतल सांगळे यांची वर्णी लागली तर उपाध्यक्षपदी कॉँग्रेसच्या नयना गावित यांचा विजय झाला.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत सांगळे यांनी राष्ट्रवादीच्या मंदाकिनी बनकर यांचा ३७-३५ असा पराभव केला. उपाध्यक्षपदासाठी गावित यांनी भाजपच्या आत्माराम कुंभरडे यांचा दोन मतांनी पराभव केला. या निवडणूकीत शिवसेना भाजपाची मैत्री फुटली. शिवसेना-भाजप हे नैसर्गिक मित्र जरी असले तरी या निवडणूकीत शिवसेनेने कॉँग्रेसच्या हाताला हात दिल्याचे दिसून आले. यामुळे शिवसेनेचा भगवा जिल्हा परिषदेवर अध्यक्षपदाच्या रुपाने फडकला तर उपाध्यक्षपद कॉँग्रेसला मिळाले.