शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

राजदंड घेण्यावरुन रस्सीखेच, महापालिकेच्या महासभेत शिवसेनेचा प्रचंड गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2021 13:02 IST

नाशिकरोडचा पाणी प्रश्न गाजला, सभा दहा मिनिटांसाठी तहकूब

ठळक मुद्देनाशिकरोड विभागासाठी 16 कोटी रुपये खर्च करून पाईपलाईन टाकण्यासाठी निविदा मागविण्यात आली असल्याचे सांगूनही शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली.

नाशिक- महापालिकेच्या महासभेत पाणीपुरवठ्याच्या विषयावर आज अभूतपूर्व गोंधळ झाला आणि महापौरांना सभागृहाचे कामकाज थांबावे लागेल मात्र त्यानंतरही शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये राजदंड घेण्यावरून रस्सीखेच सुरू झाली. त्यामुळे भाजप आणि सेनेच्या नगरसेवकात चांगलीच जुंपली.

नाशिक महापालिकेची महासभा आज दुपारी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर नाशिक रोड येथील नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला आणि नाशिकरोड परिसरात दूषित पाणीपुरवठा होत आहे त्यावर काय कार्यवाही करणार याबाबत प्रश्न उपस्थित केला. नाशिकरोड विभागासाठी 16 कोटी रुपये खर्च करून पाईपलाईन टाकण्यासाठी निविदा मागविण्यात आली असल्याचे सांगूनही शिवसेनेच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. महापौरांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करीत  शिवसेनेच्या नगरसेवकांनी गोंधळ सुरू केला आणि महापौर ज्या स्थायी समितीच्या सभागृहातून सभा संचलित करत होते त्या ठिकाणी सत्यभामा गाडेकर, रमेश धोंगडे, प्रशांत दिवे, सूर्यकांत लवटे, ज्योती खर्जुल यांच्यासह अन्य नगरसेवकांनी धाव घेतली आणि महापौरांना जाब विचारणे सुरु केले.

महापौर त्याला प्रत्युत्तर देत असताना त्यांचे ऐकूनही न घेता शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रचंड गोंधळ घातला त्यातच काही वेळाने विरोधी पक्षने अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे यांच्यासह अन्य नगरसेवक  याठिकाणी दाखल झाले त्यानंतर गोंधळ आणखीनच वाढला रमेश धोंगडे, प्रशांत दिवे, सूर्यकांत लवटे यांच्यासह काही नगरसेवकांनी महापौरांच्या पुढ्यात ठिय्या घातला. महापौर त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतानाही शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्यांचे ऐकून न घेता घोषणाबाजी सुरू केली त्यामुळे महापौरांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करत असल्याचं सांगितलं त्यानंतरीही 'उत्तर द्या, उत्तर द्या महापौर उत्तर द्या'  अशा घोषणा दिल्या या गोंधळात महापौर गर्दीतून वाट काढून कसेबसे बाहेर पडले त्यानंतर शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापौरांच्या टेबलावर  ठेवलेल्या राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र भाजपाच्या नगरसेवकांनी तो घेऊ दिला नाही मुळात ही सभा तहकूब झाले असताना देखील दोन्ही पक्षातून अकारण सुरू असलेली राजदंडाची रस्सीखेच बघून अधिकारीदेखील बाहेर पडले भाजपाचे सभागृह नेते सतीश सोनवणे आणि गटनेते जगदीश पाटील यांनी विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला मात्र शिवसेनेच्यावतीने गोंधळ सुरूच ठेवला. काही वेळाने हा गोंधळ थांबला.

टॅग्स :NashikनाशिकMuncipal Corporationनगर पालिकाShiv Senaशिवसेना