शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिरासाठी शिवसेनेचे योगदान सांगण्याची गरज नाही; महाअधिवेशनात उद्धव ठाकरेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 07:59 IST

नाशिकमध्ये मंगळवारी  आयोजित शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महाअधिवेशनाचा समारोप हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या सभेने झाला.

नाशिक : एरव्ही सनातन धर्मावर कुणी बोललं की त्याला जाब विचारला जातो. मग तुमच्याच पक्षातील एक मंत्री हिंदू धर्मात शंकराचार्यांचे योगदान काय, असा प्रश्न उपस्थित करतो तेव्हा कुणीच का बोलत नाही. भाजपमध्ये शंकराचार्यांचा अवमान आणि भ्रष्टाचाऱ्यांना स्थान असेल तर मग तुम्ही सनातन धर्म मानता की नाही, असा प्रश्न विचारत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. श्रीराम मंदिरासाठी शिवसेनेचे योगदान काय, हे इतरांना सांगण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.

नाशिकमध्ये मंगळवारी  आयोजित शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महाअधिवेशनाचा समारोप हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या सभेने झाला. यावेळी त्यांनी धर्मावर अधर्माचे संकट आल्याने ‘दार उघड, बये दार उघड’ असे जगदंबा मातेला साकडे घालत सभेला सुरुवात केली. श्रीराम आमच्या श्रद्धेचा विषय असून राममंदिरासाठी शिवसेनेचे योगदान मोठे असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला. अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी, काश्मीरमधील कलम ३७० रद्द करावे यासाठीच आम्ही भाजपला पाठिंबा दिला होता, असेही ते म्हणाले.

२०१४ला शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्नबाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे काय करणार, असा विचार करत दिल्लीत शिवसेनेला संपविण्याचा विचार झाला होता, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. त्यावेळी शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले. भाजपने दिलेले वचन मोडलं नाहीतर फडणवीस हे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते, असे ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRam Mandirराम मंदिर