सटाणा : आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साठफुटीवरील अतिक्रमणाला लक्ष्य करत शिवसेनेने डरकाळी फोडली आहे. शहरातील साठफुटी रस्त्यावर नगराध्यक्षनेच अतिक्रमण करून नागरिकांना वेठीस धरल्याचा आरोप करीत शिवसेना आपल्या स्टाईलने पवित्रा घेणार असल्याचा इशारा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अरविंद सोनवणे यांनी दिला आहे. दरम्यान पालिका निवडणुकीसाठी शहरात भाजपा-सेना युतीला अनुकूल वातावरण असले तरी पक्षश्रेष्ठीनी घेतलेल्या निर्णयानुसारच रणांगणात उतरणार असा सूरही आज झालेल्या बैठकीत निघाला .आगामी पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती.या बैठकीस पक्षाचे जेष्ठ नेते अरविंद सोनवणे ,तालुकाप्रमुख सुभाष नंदन, शहरप्रमुख शरद शेवाळे ,अॅड. वसंतराव सोनवणे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.आजच्या बैठकीत सर्वच पदाधिकाऱ्यांनी आगामी पालिका निवडणुकीसाठी युतीला अनुकूल वातावरण असल्याचा दावा केला. मात्र वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होईल तो होईल त्याची वाट न बघता गेल्या दहा वर्षांपासून पालिकेच्या सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याच्या चिरफाडसाठी शहरात जनजागृती मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला. घराघरात शहरविकासासाठी आखलेला वीस कलमी कार्यक्र म देखील पोहचवून शिवसेनेची भूमिका पटवून देण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत.पालिका निवडणुकीत पक्षनिष्ठा असलेल्या कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्यात येईल तसेच अन्य पक्षाचे तिकीट मिळाले नाही म्हणून सेनेच्या तिकिटासाठी प्रयत्न करणाऱ्या संधीसाधूंना थारा दिला जाणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. आगामी पालिका निवडणुकीबरोबरच पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका जिंकण्यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसावी असे आवाहनही शेवटी सोनवणे यांनी केले.बैठकीस ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा उपप्रमुख आनंदा महाले युवा सेनेचे तालुकाप्रमुख चेतन पाटील, शहरप्रमुख सचिन सोनवणे, हेमंत गायकवाड, दिलीप शेवाळे, दिलीप अहिरे, पप्पू शेवाळे, विजय सोनवणे, राजनिसंग चौधरी, लक्ष्मण सोनवणे, जयप्रकाश सोनवणे, शेखर परदेशी, वसंत मुंडावरे,विक्र ांत पाटील , कारभारी पगार, नंदू सोनवणे, दुर्गेश विश्वंभर, राजू जगताप, सचिन जगताप, बापू कर्डीवाल, दशरथ खन्ना, संजय सोनवणे, प्रभाकर धाबळे, नाना गांगुर्डे, अक्षय अहिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
सटाण्यात शिवसेनेची डरकाळी
By admin | Updated: July 15, 2016 01:46 IST