पेठ येथे शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 00:05 IST2020-10-22T19:40:25+5:302020-10-23T00:05:53+5:30
पेठ : येत्या नोव्हेंबर महिन्यात नगरपंचायतीची मुदत संपत असल्याने आगामी निवडणुकांची तयारी व चाचपणी करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. येथील शासकीय विश्रामगृह परिसरात झालेल्या मेळाव्यात शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांनी मार्गदर्शन केले.

पेठ येथे शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना भाऊसाहेब चौधरी, सुनील पाटील, भास्कर गावीत, विलास अलबाड, मनोज घोंगे आदी.
पेठ : येत्या नोव्हेंबर महिन्यात नगरपंचायतीची मुदत संपत असल्याने आगामी निवडणुकांची तयारी व चाचपणी करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. येथील शासकीय विश्रामगृह परिसरात झालेल्या मेळाव्यात शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाध्यक्ष सुनील पाटील यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महिलाध्यक्ष मंगला भास्कर, युवा सेना जिल्हाप्रमुख आदित्य केळकर, पेठ तालुकाप्रमुख भास्कर गावीत, सभापती विलास अलबाड, नगराध्यक्ष मनोज घोंगे, बाजार समितीचे संचालक शाम गावीत, उपनगराध्यक्ष कुमार मोंढे, तुळशिराम वाघमारे, युवा सेना ग्रामीण उपजिल्हाप्रमूख मोहन कामडी, शहराध्यक्ष गणेश शिरसाठ, नंदू गवळी, पद्माकर कामडी, पुंडलिक महाले, भागवत पाटील, महिला शहरप्रमूख शीतल रहाणे, राधाबाई राऊत, हेमलता सातपुते यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक व शिवसैनिक उपस्थित होते.