शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना म्हणते यंदा कोणतीही लाट नाही

By श्याम बागुल | Updated: April 18, 2019 14:45 IST

२०१४ च्या पुर्वी असलेल्या मुद्यांच्या आधारे मतेही मागता येणार नाही. त्यामुळे पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जे काम केले त्या कामाचा कस या निवडणुकीत लागणार असल्याचा निर्वाळा शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी दिला.

ठळक मुद्देसंजय राऊत यांचा मुक्त संवाद : निवडणुकीत कस लागणार

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : देशातील जनतेत २०१४ मध्ये असलेली लाट यंदाच्या निवडणुकीत नाही, कोणतीही लाट परत परत कधी येत नाही आणि अशा लाटेवर पुन्हा निवडणूक लढविलीही जात नाही. त्याच प्रमाणे २०१४ च्या पुर्वी असलेल्या मुद्यांच्या आधारे मतेही मागता येणार नाही. त्यामुळे पाच वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जे काम केले त्या कामाचा कस या निवडणुकीत लागणार असल्याचा निर्वाळा शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी दिला.

नाशिक येथे निवडणूक प्रचारार्थ आलेल्या राऊत यांनी पत्रकारांशी गुरूवारी मुक्त संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. विरोधी पक्षांकडे पंतप्रधानपदासाठी पाच उमेदवार आहेत या छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर बोलताना राऊत म्हणाले, ज्या ठिकाणी पाच उमेदवार पंतप्रधान पदासाठी इच्छूक आहेत, याचाच अर्थ त्यांचा पराभव निश्चित आहे. कारण एकापेक्षा अधिक लोक पदासाठी इच्छूक असल्यास ते सरकार कायम कमकुवत असते, निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी, पदासाठी त्यांच्यामध्ये मारामारी ठरलेली असते. त्यामुळे एनडीए मध्ये सर्व पक्षांनी एकत्र येवून पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांचे एकमेव नाव निश्चित केले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत प्रचार करताना पंतप्रधान मोदी यांनी विकासापेक्षा विरोधकांच्या घराण्यांवर व जातीपातीवरच बोलण्यावर भर दिल्यावर बोलताना राऊत यांनी, मोदी यांच्या सर्व सभा राजकीय असल्यामुळे ते ज्या राज्यात जातात तेथील राजकारण्यांवर बोलतात, शासकीय सभा असतील तर विकासावर बोलतील असे सांगून राऊत यांनी, १३५ कोटी लोकसंख्येच्या देशात जात, धर्माचा विषय तर येणारच असे सांगितले. वंचित आघाडी ही भाजपाची बी टीम असल्याच्या आरोपाचे त्यांनी खंडन केले. रिपार्इंचे सर्व गट निस्तेज झाले असून, त्यांनी सर्वांनी एकत्र येवून रालोआत सामील व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा