केंद्राच्या विरोधात शिवसेनेची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:25 IST2021-02-06T04:25:15+5:302021-02-06T04:25:15+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिवसेनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. केंद्राने ...

केंद्राच्या विरोधात शिवसेनेची निदर्शने
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शिवसेनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. केंद्राने पेट्रोल व डिझेलच्या किमतीवर भरमसाठ एक्साईज ड्यूटी लादल्यामुळे इंधनाचे दर शंभरीकडे गेल्याचा आरेाप यावेळी करण्यात आला. घरगुती सिलिंडरच्या वाढलेल्या किमतीमुळेदेखील मालवाहतूक खर्च वाढला असून त्यामुळे नागरिकांना महागाईला सामाेरे जावे लागत आहे. इंधन व गॅस दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांचा मोठी झळ बसली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकारी मांढरे यांना निवेदन देत महागाई कमी न केल्यास सेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशारादेखील यावेळी देण्यात आला. याप्रसंगी शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर, माजी महापौेर विनायक पांडे, माजी आमदार वसंत गिते, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी शहरप्रमुख सचिन मराठे, मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, महिला आघाडीच्या सत्यभामा गाडेकर आदींसह शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.
(फोटो६९)