शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

शिवसेनेकडून व्यंकय्या नायडू यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 18:05 IST

वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी (दि.२२) राज्यसभेत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली.  त्यामुळे राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना अवमान करणाऱ्या कडक शब्दात सूचना केल्याचा आरोप करीत शिवसेनेने शालिमार येथील पक्ष कार्यालयासमोर व्यंकय्या नायडू यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून भाजपाविरोधात घोषणाबाजी केली. 

ठळक मुद्देउदयन राजे यांच्या राज्यसभेतील घोषणेवरून राजकारण घोषणेनंतर नायडू यांनी अवमान केल्याचा आरोप शिवसेनेने जाळला व्यंकय्या नायडूंचा प्रतिकात्मक पुतळा

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी (दि.२२) राज्यसभेत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली.  त्यामुळे सभागृहाचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना अवमान करणाऱ्या कडक शब्दात सूचना केल्याचा आरोप करीत शिवसेनेने शालिमार येथील पक्ष कार्यालयासमोर व्यंकय्या नायडू यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून भाजपाविरोधात घोषणाबाजी केली. खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यसभेत दिलेल्या घोषणेवरून एकेकाळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मित्रपक्ष म्हणून सत्ता उपभोगणारे भारतीय जनता पार्टी व शिवसेना पक्ष एकमेकांविरोधात उभे राहिले आहे. शिवसनेने भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणेला विरोध करणे ‘हेच का तुमचे हिंदुत्व’ असा सवाल केला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते असलेले व्यंकय्या नायडू यांच्या भूमिकेतून भाजपचीच भूमिका स्पष्ट होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणेला विरोध करण्याची भूमिका ही व्यंकाय्या नायडू यांच्यासोबत भाजपचीही असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्तेवर आलेल्या भाजपला या देशातील जनताच धडा शिकवेल, असा इशाराही शिवसेनेतर्फे जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, महानगरप्रमुख महेश बिडवे, मनपा विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, नगरसेवक सुनील गोडसे, डी. जी. सूर्यवंशी,  योगेश बेलदार, योगेश देशमुख, नाना काळे, पप्पू टिळे, गोरख वाघ, प्रमोद नाथेकर, अनिल बागुल, शशिकांत कोठुळे, देवा जाधव, संजय चिंचोरे, राजेंद्र नानकर, सचिन बांडे, हेमंत उन्हाळे, राजेंद्र वाकसरेआदी उपस्थित होते.  

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकShiv SenaशिवसेनाBJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले