शिवसेनेनेही केले इन्कमींग सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:14 IST2020-12-24T04:14:27+5:302020-12-24T04:14:27+5:30

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हा ...

Shiv Sena also started incoming! | शिवसेनेनेही केले इन्कमींग सुरू!

शिवसेनेनेही केले इन्कमींग सुरू!

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, मनपातील विरोधी पक्ष नेता अजय बोरस्ते, शिवसेना गटनेता विलास शिंदे, राजू लवटे आदी उपस्थित होते.

महापालिका निवडणुकीचे पडघम सुरू झाले आहेत. राज्यातील राजकारणातदेखील रस्सीखेच सुरू झाली आहे. नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारण्यात आलेल्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी शिवगठबंधन बांधले असले तरी पुन्हा त्यांना स्वगृही घेण्यास भाजपने खळखळ केली नाही. तर दुसरीकडे शिवसेनेने भाजपा सातपूर मंडलाच्या उद्योग आघाडीचे अध्यक्ष

समाधान देवरे यांच्यासह २२ कार्यकर्त्यांनी प्रवेश देऊन इन्कमींग सुरू झाले असल्याचे अप्रत्यक्षरीत्या जाहीर केले आहे. दरम्यान, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी ही केवळ एक सुरुवात आहे. भाजपाचे अनेक नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असून, लवकरच त्यांचे प्रवेश सोहळे सुरू हेातील, असे सांगितले.

--------------

छायाचित्र आर फोटोवर २२ शिवसेना- शिवसेनेेचे नूतन महानगरपदी नियुक्ती झालेले सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी नाशिक महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार करा, असा सल्ला उपस्थित जिल्हा प्रमुख विजय करंजकर, अजय बोरस्ते, विलास शिंदे, राजू लवटे आदींना दिला.

Web Title: Shiv Sena also started incoming!