शिवसंपर्क अभियानात आगामी नगर परिषद निवडणुकीची तुतारी निनादली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:13 IST2021-07-25T04:13:29+5:302021-07-25T04:13:29+5:30
नांदगाव : गत दीड वर्षात निर्माण झालेल्या जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. कोरोनाकाळात जिवावर उदार होऊन ...

शिवसंपर्क अभियानात आगामी नगर परिषद निवडणुकीची तुतारी निनादली
नांदगाव : गत दीड वर्षात निर्माण झालेल्या जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शिवसंपर्क अभियान सुरू केले आहे. कोरोनाकाळात जिवावर उदार होऊन समाजाची सेवा केली त्यांच्या सन्मानासाठी हे अभियान होते, अशा शब्दांत आमदार सुहास कांदे यांनी गुप्ता लॉन्समध्ये आयोजिलेल्या कार्यक्रमात आपले विचार मांडले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे होते. या अभियानाच्या निमित्त आगामी निवडणुकीची तुतारीच निनादली आहे.
कांदे पुढे म्हणाले. सफाई कामगारांचे आम्ही देणे लागतो, त्यांच्यासाठी घरे मंजूर करणार असून, नांदगावच्या पिण्याच्या पाण्यासाठी ५४ कोटींच्या योजनेची मंजुरी अंतिम टप्प्यात आहे. २० कोटींच्या विकास योजना हाती घेतल्या आहेत. १० कोटींची कामे सुरू झाली आहेत. मात्र आपल्याच प्रभागातील उद्घाटनप्रसंगी उदासीन असणाऱ्या काही नगरसेवकांबद्दल कांदे यांनी नाराजी व्यक्त केली. नांदगाव नगर परिषदेवर पुन्हा भगवा फडकविण्याचे आवाहन त्यांनी बापूसाहेब कवडे व नगराध्यक्ष राजेश कवडे यांना केले.
सुनील जाधव, विलास आहेर, संतोष गुप्ता, विष्णू निकम आदींनी विचार मांडले.
देवीदास साबळे, नामदेव कचरू, अशोक वाघ, मंगला गुढेकर, सावित्री गुढेकर, संगीता गुढेकर, आरती पुलावे, विजय गुढेकर, कांताबाई फुलारे यांचा कोरोनायोद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.
सभापती तेज कवडे, जि.प. सदस्य रमेश बोरसे, अल्ताफ खान, नंदू पाटील, किरण देवरे, काशीनाथ शिंदे, सुभाष कुटे, नावंदर, प्रमोद भाबड, सागर हिरे, राजेंद्र देशमुख, अल्ताफ खान, बाळासाहेब शेवरे, डॉ. सुनील तुसे, नितीन जाधव, आनंद कासलीवाल, सुधीर देशमुख, महावीर पारख, राजेंद्र जगताप, शंकर शिंदे, प्रदीप कासलीवाल आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन साळवे यांनी केले.
-------------------
फोटो
शिवसंपर्क अभियानात बोलताना आमदार सुहास कांदे. समवेत व्यासपीठावर बापूसाहेब कवडे, राजेश कवडे, विलास आहेर, विष्णू निकम, तेज कवडे, रमेश बोरसे आदी. (२४ नांदगाव १)
240721\24nsk_19_24072021_13.jpg
२४ नांदगाव १