शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

By Admin | Updated: March 9, 2015 01:47 IST2015-03-09T01:47:27+5:302015-03-09T01:47:56+5:30

शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

Shiv Jayanti celebrates with great enthusiasm | शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

नाशिक : श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय..., हर हर महादेश..., जय भवानी, जय शिवाजी असा जल्लोष आणि जयघोष करीत शहर परिसरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संपूर्ण शहरात भगवे ध्वज आणि फताका फडकत असल्याने भगवेमय वातावरण तयार झाले होते. सकाळपासूनच ध्वनिफितीवरील शिवगीतांनी वातावरण चैतन्यमय झाले होते. ढोल- ताशांचा गजर आणि शिवनामाच्या गजरात शहर परिसरातून जयंती साजरी करण्यात आली.
शिवसेवा युवक मित्रमंडळ शिवसेवा युवक मित्रमंडळातर्फे संत गाडगे महाराज चौक येथे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. खासदार हेमंत गोडसे, तसेच दत्ता गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी विनायक पांडे, उपजिल्हा प्रमुख जगन आगळे, राजेंद्र देसाई, सचिन भालेकर, महेश बडवे, बाळासाहेब कोकणे, चंद्रकांत पांडे, संदीप कानडे, संतोष ठाकूर, सचिन बांडे, कुंदन दळे तसेच ज्येष्ठ शिवसैनिक उपस्थित होते.

Web Title: Shiv Jayanti celebrates with great enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.