शिखर बॅँकेसाठी शिरीषकुमार कोतवालांचा ठराव संमत
By Admin | Updated: June 26, 2015 01:18 IST2015-06-26T01:17:50+5:302015-06-26T01:18:13+5:30
शिखर बॅँकेसाठी शिरीषकुमार कोतवालांचा ठराव संमत

शिखर बॅँकेसाठी शिरीषकुमार कोतवालांचा ठराव संमत
नाशिक : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅँक (शिखर बॅँक) निवडणुकीला मतदान करण्याचा व उभे राहण्याचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडून निवडायच्या प्रतिनिधी पदासाठी चांदवडचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या नावाचा ठराव संमत करण्यात आला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या सभागृहात विशेष बैठक बोेलविण्यात आली होती. बैठकीस अध्यक्ष नरेंद्र दराडे, उपाध्यक्ष सुहास कांदे यांच्यासह सर्व १९ संचालक उपस्थित होते. विषय पत्रिकेवर राज्य शिखर बॅँकेसाठी मतदान करण्यासाठी व शिखर बॅँकेच्या निवडणुकीसाठी उभे राहण्यासाठी प्रतिनिधी पाठविण्याचा विषय होता. सुरुवातीला या प्रतिनिधी पदासाठी माजी अध्यक्ष परवेज कोकणी व सचिन सावंत हे दोन्ही इच्छुक होते. या उमेदवारीवरून दोघांमध्ये बैठकीतच काही वेळ शाब्दिक चकमक उडाल्याचे समजते. एकमताने एकच नाव ठरविण्याबाबत सर्वच संचालकांची चर्चा सुरू होती. अखेर एकमत न झाल्याने या प्रतिनिधी पदासाठी निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली. सचिन सावंत व शिरीषकुमार कोतवाल हे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात होेते. त्यात शिरीषकुमार कोतवाल यांना त्यांचे स्वत:च्या मतासह अध्यक्ष नरेंद्र दराडे, किशोर दराडे, केदा अहेर, धनंजय पवार, अॅड. संदीप गुळवे, नामदेव हलकंदर, आमदार जे. पी. गावित, आमदार अनिल कदम, गणपतराव पाटील, शिवाजी चुंबळे व परवेज कोकणी यांनी मतदान केले. विरोधात उभ्या असलेल्या सचिन सावंत यांनीही कोतवाल यांना मतदान केले. सचिन सावंत यांना उपाध्यक्ष सुहास कांदे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, आमदार अपूर्व हिरे, माणिकराव कोकाटे, अद्वय हिरे, डॉ.शोभा बच्छाव व दिलीप बनकर अशी आठ मते मिळाली.