शिर्डी-सुरत महामार्ग खड्ड्यांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 02:51 IST2020-10-23T22:46:38+5:302020-10-24T02:51:19+5:30

शिर्डी-सुरत या मुख्य महामार्गाचे गेल्या कित्येक महिन्यांपासून कासव गतीने काम सुरू असल्याने परिसरातील वणी चौफुली ते मुखेड फाटा या ठिकाणी ख‌ड्ड्यात  रस्ता की रस्त्यात खड्डा अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या टमाटा हंगामामुळे उत्पादक शेतकऱ्यांना वाहनांचा बिघाड होऊन आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती व्हावी व सुखकर प्रवास व्हावा, अशी मागणी शेतकऱ्यांसह वाहनधारकांकडून होत आहे.

Shirdi-Surat highway in potholes | शिर्डी-सुरत महामार्ग खड्ड्यांत

शिर्डी-सुरत महामार्ग खड्ड्यांत

ठळक मुद्दे शेतकऱ्यांचे हाल : रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

पिंपळगाव बसवंत : शिर्डी-सुरत या मुख्य महामार्गाचे गेल्या कित्येक महिन्यांपासून कासव गतीने काम सुरू असल्याने परिसरातील वणी चौफुली ते मुखेड फाटा या ठिकाणी ख‌ड्ड्यात  रस्ता की रस्त्यात खड्डा अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या टमाटा हंगामामुळे उत्पादक शेतकऱ्यांना वाहनांचा बिघाड होऊन आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती व्हावी व सुखकर प्रवास व्हावा, अशी मागणी शेतकऱ्यांसह वाहनधारकांकडून होत आहे.
पिंपळगाव बसवंत परिसरातील वणी चौफुली, मुखेड फाटा आणि अंतरवेली फाटा या ठिकाणी अपघात हे समीकरण कायम असतानादेखील या ठिकाणच्या रस्त्याचे कामे कासव गतीने सुरू आहे. त्यामुळे दररोज शेतमालाच्या वाहनांत बिघाड होऊन या ठिकाणी छोटे-मोठे अपघात घडतात. तसेच देवी मंदिराच्या परिसरातील वस्तीलगत भूमिगत नाल्यासाठी अंदाचे ५  फुटांहून अधिक खोल नाली गेल्या वीस-पंचवीस दिवसांपासून खोदून ठेवल्याने त्या गटारीच्या नालीत असंख्य नागरिक व लहान मुले पडले आहेत. तक्रार करूनही स्थानिक लोकप्रतिनिधी व ठेकेदार दखल घेत नसल्याने भविष्यात मोठी दुर्घटना परिसरात घडू शकते. रस्त्याचे काम पूर्ण व्हावे व वाहनधारकांसह शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली होत आहे. 

Web Title: Shirdi-Surat highway in potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.