शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

खामखेडा नजिकच्या शिपल्या डोंगराला आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 01:04 IST

खामखेडा : येथील बुटबारे परिसरातील शिपल्या डोंगरास अचानक आग लागली. ग्रामस्थ व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या शर्तीच्या प्रयत्नाने आग विझवण्यात यश आले. त्यामुळे या आगीत कोणतीच जीवितहानी झाली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

ठळक मुद्देअनर्थ टळला : पशू-पक्ष्यांचे वाचले प्राण

खामखेडा : येथील बुटबारे परिसरातील शिपल्या डोंगरास अचानक आग लागली. ग्रामस्थ व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या शर्तीच्या प्रयत्नाने आग विझवण्यात यश आले. त्यामुळे या आगीत कोणतीच जीवितहानी झाली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.खामखेडा गावाच्या उत्तरेस असलेल्या मांगबारी घाट ते डांगसौंदाणे घाट अशी १३ ते १५ किलोमीटर संलग्न सह्यांद्रीच्या सलग डोंगररांगा पिळ्कोस, खामखेडा, विसापूर, बिजोरे, भादवण, चाचेर, पांढरीपाडा, धनगरपाडा, रंगापूर या गावांना लाभल्या आहेत. या डोंगर रांगेवर पाण्याचे स्रोत, दाट झाडी असल्यामुळे या डोंगर रांगेत बिबट्या तसेच वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे.गेल्या दोन दिवसांपूर्वी बागलाण तालुक्याच्या हद्दीतील तिळवण किल्ला व किल्ल्याच्या परिसरातील डोंगराला आग लागली. ही आग हळु हळु पसरत देवळा वनपरिक्षेत्र हद्दीतील खामखेडा येथील फांगदर शिवारातील बूटबारे परिसराच्या शिपल्या डोंगराच्या परिसरातील वनकक्ष क्रमांक २४६ च्या आग क्षेत्रात लागली.ही आग रौद्ररूप धारण करत असतानाच या आगीचे वृत्त ग्रामस्थांनी देवळा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वनविभाग व ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करत आग विझवून डोंगरावर वास्तव्य करणाऱ्या असंख्य प्राणी, पक्षी व जीव-जंतूंचे प्राण वाचवले.नाशिक दक्षता विभागाचे स्वप्निल घुरे, देवळा वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत पाटील यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी माजी सरपंच संजय मोरे वन समितीचे अध्यक्ष दिपक मोरे, संजय शेवाळे, रवींद्र शेवाळे, संजय शेवाळे, श्रावण शेवाळे, दीपक शेवाळे, फांगदर वस्तीचे आदिवासी बांधव तसेच वनपाल पी. पी. सोमवंशी, डी. पी. गवळी, वनरक्षक शांताराम आहेर, टि. एम. भामरे व ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले.

टॅग्स :AccidentअपघातFairजत्रा