गर्भपात प्रकरणातील शिंदेची कारागृहात रवानगी
By Admin | Updated: March 1, 2017 00:18 IST2017-03-01T00:18:15+5:302017-03-01T00:18:38+5:30
नाशिक : अवैध गर्भलिंग तपासणी तसेच गर्भपातप्रकरणी डॉ़ शिंदे हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे संचालक डॉ़ बळीराम शिंदे याची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी टंडन यांनी डॉक्टर शिंदेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़

गर्भपात प्रकरणातील शिंदेची कारागृहात रवानगी
नाशिक : अवैध गर्भलिंग तपासणी तसेच गर्भपातप्रकरणी पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेले डॉ़ शिंदे हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे संचालक डॉ़ बळीराम शिंदे याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी (दि़ २८) न्यायालयात हजर करण्यात आले होते़ प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी टंडन यांनी डॉक्टर शिंदेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ दरम्यान, आठ दिवसांच्या पोलीस कोठडीच्या कालावधीत शिंदे हॉस्पिटलमधून गर्भपाताच्या गोळ्या तसेच इंजेक्शन तसेच गर्भतपासणीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ तसेच डॉ. शिंदेच्या वैद्यकीय पदवीबाबतही संशय व्यक्त केला जातो आहे़
मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक पी़ डी़ पवार यांनी रविवारी (दि़२६) केलेल्या तपासणीत हॉस्पिटलची कायदेशीर परवानगी नसताना त्यामध्ये अतिदक्षता विभाग, आॅपरेशन थिएटर तसेच मेडिकलदेखील आहे़ विशेष म्हणजे गर्भपाताची परवानगी नसतानाही हॉस्पिटलमध्ये गर्भपाताच्या गोळ्या व इंजेक्शन आढळून आले आहेत़ विशेष म्हणजे या गोळ्या मेडिकलमध्ये मिळत नाहीत. शिवाय त्या घेण्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञांनाही प्रथम चेकद्वारे पैसे अदा करून मागवाव्या लागतात व गोळ्यांचा हिशेबही ठेवावा लागतो़ अशोकनगर येथील एका गर्भवती महिलेची तपासणी केल्यानंतर स्त्री गर्भ असल्याचे सांगून गर्भपात केल्याच्या कारणावरून मनपाच्या आरोग्य विभागाने छापा टाकून चौकशी केली़ यात गर्भपात करीत असल्याचे समोर आल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालय सील करून डॉ़ शिंदे विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी)
, तर रविवारी महिला पोलीस उपनिरीक्षक पी़ डी़ पवार यांनी शिंदे हॉस्पिटल व रिसर्च सेंटरची तपासणी करून सील केले आहे़ तर डॉ़ शिंदे याचे ओझरच्या हॉस्पिटलमधील सोनोग्राफी मशीन निफाडच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ़ एम़ आऱ राठोड यांनी यापूर्वीच सील केले आहे़
दैव बलवत्तर म्हणून महिला वाचली
अशोकनगर परिसरातील महिलेचा गर्भपात करताना सुमारे तीन सेंटीमीटरपर्यंत तिची गर्भपिशवीच फाटून रक्तस्त्राव झाला होता़ या महिलेचे दैव बलवत्तर म्हणून तिचे प्राण वाचले़ विशेष म्हणजे या महिलेच्या सांगण्यानुसार गर्भपात करताना भूलही देण्यात आलेली नव्हती़ गर्भलिंग तपासणीचे मशीन एका चादरीत ठेवून ब्लॅक अॅण्ड व्हाइट टीव्हीद्वारे महिलांची गर्भलिंगतपासणी केली जात होती़
- पी़ डी़ पवार, महिला पोलीस उपनिरीक्षक, मुंबई नाका पोलीस ठाणे़