नांदूरटेक सोसायटीच्या सभापतिपदी शिंदे

By Admin | Updated: December 3, 2015 22:09 IST2015-12-03T22:09:04+5:302015-12-03T22:09:45+5:30

नांदूरटेक सोसायटीच्या सभापतिपदी शिंदे

Shinde as the Chairman of Nandurtek Society | नांदूरटेक सोसायटीच्या सभापतिपदी शिंदे

नांदूरटेक सोसायटीच्या सभापतिपदी शिंदे

चांदवड : तालुक्यातील नांदूरटेक येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या सभापतिपदी ज्ञानेश्वर रामनाथ शिंदे, तर उपसभापतिपदी चहाबाई केशव शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नांदूरटेक सोसायटीमध्ये विकास पॅनलला १२ पैकी नऊ जागांवर विजय मिळाला होता.
सभापती निवडीसाठी ज्ञानेश्वर शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. सभापती व उपसभापतींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संचालक कडू शिंदे, रघुनाथ शिंदे, समाधान शिंदे,
संतोष ठाकरे, जीवन शिंदे, चित्रा जाधव, चिंतामण खरे तर सचिव बापूसाहेब देशमाने, डॉ. प्रकाश शिंदे, सरपंच प्रभाकर ठाकरे, उपसरपंच दीपक शिंदे, भास्कर शिंदे, राजाराम देवरे, रामनाथ पा. शिंदे, कोंडाजी ठाकरे, शांताराम शिंदे, अंबादास
ठाकरे आदिंनी निवडीसाठी प्रयत्न केले. सभापती, उपसभापतींचा
सत्कार डॉ.आत्माराम कुंभार्डे, विलासदादा ढोमसे, नितीन अहेर, का.भा. अहेर यांच्या हस्ते करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Shinde as the Chairman of Nandurtek Society