शेवगेदारणा येथे सहा फुटी नाग पकडला

By Admin | Updated: August 7, 2016 23:36 IST2016-08-07T23:35:50+5:302016-08-07T23:36:46+5:30

शेवगेदारणा येथे सहा फुटी नाग पकडला

Shevgeedarana caught a six-foot snake | शेवगेदारणा येथे सहा फुटी नाग पकडला

शेवगेदारणा येथे सहा फुटी नाग पकडला

भगूर : येथील येथील सर्पमित्र मंगेश परदेशी व चेतन दोंदे यांनी देवळालीजवळील शेवगेदारणा गावात सहा फूट लांबीचा नाग पकडल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. बाजीराव गोडसे यांच्या गोठ्यात सदर नाग ठाण मांडून बसला होता. पुराचे पाणी गोठ्यापर्यंत गेल्याने गोडसे यांच्या निदर्शनास हा नाग आला. त्यांनी सर्पमित्र परदेशी व दोंदे यांना दूरध्वनी करून याबाबतची माहिती दिली. या दोघांनीही गोठ्यातून सहा फूट नागाला पकडले. नागाला पाहण्यासाठी शेवगेदारणामधील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. याप्रसंगी सर्प पकडण्यासाठी मंडलाचे प्रमोद शेटे, प्रतीक शेटे, मनोज पाखरे, मयूर शेटे, ईजाज पटेल, विकास हगवणे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)

Web Title: Shevgeedarana caught a six-foot snake