शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शेट्टींची एण्ट्री; विरोधकांकडून भाजपाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 01:09 IST

उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करूनही अधिकृत आदेशाची प्रत न मिळाल्याने अखेर न्यायालयाच्याच आदेशाने भाजपाचे नगरसेवक हेमंत शेट्टी यांना दोन तासांसाठी महापालिकेच्या महासभेला हजर राहण्याची परवानगी मिळाली आणि शेट्टींची स्वारी पोलीस बंदोबस्तात मंगळवारी (दि.२१) झालेल्या महासभेत अवतरली.

ठळक मुद्दे शेट्टींची स्वारी पोलीस बंदोबस्तात महासभेत भाजपाच्या नगरसेवकांची फौज दिमतीला महासभेतील हजेरीमुळे शेट्टींचे नगरसेवकपद जाता जाता शाबूत राहिले

नाशिक : उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करूनही अधिकृत आदेशाची प्रत न मिळाल्याने अखेर न्यायालयाच्याच आदेशाने भाजपाचे नगरसेवक हेमंत शेट्टी यांना दोन तासांसाठी महापालिकेच्या महासभेला हजर राहण्याची परवानगी मिळाली आणि शेट्टींची स्वारी पोलीस बंदोबस्तात मंगळवारी (दि.२१) झालेल्या महासभेत अवतरली. स्वाक्षरी  करण्यापासून ते सभागृहात कामकाज घेण्यापर्यंतचे सारे सोपस्कार पार पाडण्यासाठी शेट्टीच्या दिमतीला पंचवटीतीलच भाजपाच्या नगरसेवकांची फौज दिमतीला होती. अखेर, महासभेतील हजेरीमुळे शेट्टींचे नगरसेवकपद जाता जाता शाबूत राहिले. दरम्यान, विरोधकांनी महासभेबाबत तांत्रिक मुद्दे उपस्थित करत भाजपाची हजेरी घेण्याचा प्रयत्न केला परंतु, महापौरांनी त्याकडे काणाडोळा करत सभेचे कामकाज पुढे नेले.  गुन्हेगाराच्या खुनाच्या आरोपावरून कारागृहात असलेल्या भाजपा नगरसेवक हेमंत शेट्टी यांचे नगरसेवकपद शाबूत राहण्यासाठी मंगळवारी (दि.२१) महासभेला त्यांची उपस्थिती अनिवार्य होती. शेट्टी यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्यांना न्यायालयाच्या आदेशाची अधिकृत प्रत मंगळवारी दुपारपर्यंत प्राप्त झालेली नव्हती. तत्पूर्वी, शेट्टी यांनी न्यायालयाकडेच विनंती अर्ज करून महासभेला हजर राहण्याची परवानगी मागितली होती, तर न्यायालयानेही महापौरांकडून महासभा असल्याबाबतचे पत्र मागविले होते.  त्यानुसार, न्यायालयाने शेट्टी यांना महासभेच्या कामकाजाला हजर राहण्यासाठी दुपारी १ ते ३ या दोन तासांची मुदत दिली. सभागृहात  शेट्टी म्हणाले, माझे प्रस्ताव मंजूर करा दरम्यान, महासभेत शेट्टी यांनी चार प्रस्ताव सादर केलेले होते. महासभेत राष्टÑवादीचे गजानन शेलार फाळके स्मारकातील ठेक्यासंदर्भातील प्रस्तावावर बोलत असताना शेट्टींच्या बाजूला बसलेले भाजपा नगरसेवक जगदीश पाटील यांची मात्र घालमेल होत होती. त्यांनी पीठासनावर जात शेट्टी यांना काही मिनिटांचाच अवधी उरल्याने बोलू देण्याची विनंती महापौरांकडे केली. त्यामुळे महापौरांनी शेलार यांना मध्येच थांबवत शेट्टी यांना बोलण्याची संधी दिली आणि शेट्टी यांनी एका ओळीत माझे प्रस्ताव मंजूर करा, असे सांगत पोलीस बंदोबस्तातच सभागृह सोडले. तत्पूर्वी, विरोधकांनी सोमवारी झालेली महासभा तहकूब होती काय, असा सवाल करत मंगळवारच्या सभेबाबत तांत्रिक मुद्दे उपस्थित केले आणि भाजपाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, महापौरांनी सोमवारची महासभा तहकूब नसल्याचे सांगत उर्वरित कामकाज मंगळवारी घेतले असल्याचे स्पष्ट केले आणि विरोधकांना गप्प करत सभेचे कामकाज पुढे नेले.दरम्यान, शेट्टी यांच्या हजेरीने त्यांचे नगरसेवकपद  शाबूत राहिले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक