शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
3
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
4
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
5
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
6
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
7
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
8
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
9
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
10
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
11
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
12
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
13
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
14
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
15
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
16
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
17
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
18
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
19
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
20
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?

मालेगावी गोळीबारात शेंदुर्णीचा तरुण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 23:55 IST

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर दुचाकीवरून आलेल्या तिघा अज्ञातांपैकी एकाने गोळीबार केल्याने जावीद रज्जाक खाटीक (३८, रा. शेंदुर्णी हातोडा, ता. जामनेर, जि. जळगाव) हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्यांच्यावर धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देया संदर्भात अलीम सलीम खाटीक यांनी पोलिसात फिर्याद दिली

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर दुचाकीवरून आलेल्या तिघा अज्ञातांपैकी एकाने गोळीबार केल्याने जावीद रज्जाक खाटीक (३८, रा. शेंदुर्णी हातोडा, ता. जामनेर, जि. जळगाव) हे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. त्यांच्यावर धुळे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या संदर्भात अलीम सलीम खाटीक यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. गुरुवारी (दि. ८) पहाटे पावणे चार वाजण्याच्या सुमारास गोळीबाराचा प्रकार घडला. जावीद खाटीक व अलीम खाटीक हे पिकअपवरून (क्रमांक एम. एच. ४८, एजी ८७६१) शेळ्या भरून कल्याणकडे जात असताना मुंबई - आग्रा महामार्गावर पवारवाडी शिवारात विना क्रमांकाच्या दुचाकीवरून आलेल्या तिघा जणांनी पिकअपच्या दरवाजाजवळ येत गाडी थांबविण्यास सांगितले. गाडी थांबविली नसल्याने दुचाकीवर बसलेल्या एकाने बंदूक काढून गोळीबार केला. यात जावीद खाटीक हे जखमी झाले आहेत. रिजवान पार्क ते जनता सायझिंग दरम्यान ही घटना घडली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी भेट दिली. संशयित आरोपींच्या शोधासाठी पथक नियुक्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक व्ही. एल. भोये हे करीत आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी