पावसाळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी आता निवारा शेड
By Admin | Updated: January 23, 2015 01:25 IST2015-01-23T01:20:07+5:302015-01-23T01:25:13+5:30
म्हैसकर : कुंभमेळ्याच्या कामांचा घेतला आढावा

पावसाळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी आता निवारा शेड
नाशिक : येत्या जुलै महिन्यात सुरू होणाऱ्या कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक त्या सुविधा द्याव्यात तसेच पावसाळ्यात भाविकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात निवारा शेड बांधावेत, अशी सूचना नगरविकास खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी केली आहे. कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसंदर्भात म्हसकर यांनी गुरुवारी नाशिकमध्ये येऊन आढावा घेतला. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीस विभागीय आयुक्त एकनाथ डवले, जिल्हाधिकारी विलास पाटील, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, अहमदनगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलीस अधीक्षक संजय मोहिते पोलीस आयुक्त आदि उपस्थित होते. श्रीमती म्हैसकर यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील विकासकामांचा आढावा घेतला. कुंभमेळा पावसाळ्यात येत असल्याने या कालावधीत आरोग्य विषयक विशेष दक्षता घेण्यात यावी, नदीपात्राकडे जाणाऱ्या रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, बा' विमानतळावर सामावू शकणाऱ्या गर्दीबाबत अभ्यास करून त्यानुसार आपत्कालीन नियोजनही तयार ठेवावे, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची शहरातील सर्व भागात व्यवस्था करण्यात यावी, ज्या भागातून भाविक मोठ्या प्रमाणात येतात, त्या मार्गावरील जिल्'ांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क ठेवावा, रुग्णवाहिका आणि अग्निशमन वाहने आवश्यकतेनुुसार इतर जिल्'ातून मागविण्यात यावी, असेही त्याांनी सांगितले.