नाईक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी शेळके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 00:13 IST2020-07-12T22:35:20+5:302020-07-13T00:13:16+5:30
नांदूरशिंगोटे येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संस्थापक प्रारब्ध शेळके, तर उपाध्यक्षपदी शरदचंद्र घुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नांदूरशिंगोटे येथील क्रां. वसंतराव नाईक पतसंस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रारब्ध शेळके, उपाध्यक्ष शरदचंद्र घुले यांचा सत्कार करताना संचालक.
नांदूरशिंगोटे : येथील क्रांतिवीर वसंतराव नाईक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी संस्थापक प्रारब्ध शेळके, तर उपाध्यक्षपदी शरदचंद्र घुले यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
येथील अदिती मंगल कार्यालयात सहायक निबंधक एस. पी. रुद्राक्ष यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत निवडप्रक्रिया राबविण्यात आली. मावळते अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड व उपाध्यक्ष जनाबाई भाबड यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिला होता. अध्यक्षपदासाठी शेळके व उपाध्यक्षपदासाठी घुले यांनी अर्ज दाखल केला होता.
दोन्हीही पदांसाठी एकेक अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी रुद्राक्ष यांनी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
याप्रसंगी संचालक भारत मुंगसे, लक्ष्मण शेळके, संदीप भाबड, डॉ. राधाकृष्ण सांगळे, संजय शेळके, कैलास बर्के, बाळासाहेब आव्हाड, अनिल नवले, देवराम आगिवले, डॉ. श्रेया शेळके, भाऊपाटील शेळके, सुनील मुंडे, निवृत्ती शेळके, दशरथ भाबड, व्यवस्थापक नजीर शेख आदींसह संस्थेचे सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शेळके व उपाध्यक्ष घुले यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.