तुटलेल्या वीजवाहक तारेतून मेंढी, दोन मुलांना लागला शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2020 03:09 PM2020-07-05T15:09:46+5:302020-07-05T15:10:43+5:30

पिळकोस : येथील विसापूर फाट्यावर राज्य महामार्ग सतरा लगत शनिवारी (दि.४) वीजवाहक तार तुटून पडली याबाबत वीजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कळवूनही त्याची वेळीच दखल घेतली नाही. सदर तारेत वीजप्रवाह सुरु होता. दरम्यान दुपारीबारा वाजता या रस्त्याने मेंढपाळ हे मेंढ्यांचा कळप घेऊन जात असताना एका मेंढीला तारेतून विजेचा जोराचा धक्का बसल्याने बेशुध्द झाली तर मेंढपाळाची मुलांनाही विजेचा शॉक बसला. शेजारी राहणारे शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

Sheep and two children were shocked by a broken wire | तुटलेल्या वीजवाहक तारेतून मेंढी, दोन मुलांना लागला शॉक

तुटलेल्या वीजवाहक तारेतून मेंढी, दोन मुलांना लागला शॉक

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

पिळकोस : येथील विसापूर फाट्यावर राज्य महामार्ग सतरा लगत शनिवारी (दि.४) वीजवाहक तार तुटून पडली याबाबत वीजवितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ कळवूनही त्याची वेळीच दखल घेतली नाही. सदर तारेत वीजप्रवाह सुरु होता. दरम्यान दुपारीबारा वाजता या रस्त्याने मेंढपाळ हे मेंढ्यांचा कळप घेऊन जात असताना एका मेंढीला तारेतून विजेचा जोराचा धक्का बसल्याने बेशुध्द झाली तर मेंढपाळाची मुलांनाही विजेचा शॉक बसला. शेजारी राहणारे शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे कि, शनिवारी या परिसर पाऊस झाल्याने राज्य महामार्ग क्र मांक सतरा लगत गेलेली एल टी ची वीजवाहक तार तुटून रस्त्याच्याकडेला पडली. याबाबत तेथील शेतकºयांनी कंपनीच्या कर्मचाºयांना याबाबतची माहिती दिली. कर्मचाºयांनी प्रथमता या ठिकाणचा वीजप्रवाह खंडित करणे गरजेचे असतात याकडे साफ दुर्लक्ष केले गेले असल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात आले. बारा वाजेपर्यंत या तुटलेल्या तारेत वीजप्रवाह सुरु असल्याने रस्त्याने जाणाºया मेंढ्यांच्या कळपातील एका मेंढीला विजेचा जोराचा धक्का बसला व सदर घटना घडली. त्यानंतर वीजप्रवाह खंडित करण्यास सांगितले. असता वीज प्रवाह खंडित करण्यात आला.
पावसाला लागण्यापूर्वी या परिसरात महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीची कामे झाली, परंतु महावितरण कंपनीने मात्र परिसरात शेतकºयांच्या बांधा बांधाने असलेल्या एलटी लाईनचे प्रचंड असे विजेचे जाळे पसरले असून त्याची देखभाल दुरुस्ती महावितरण कंपनीकडून गेल्या तीस वर्षापासून केली गेली नाही. वीज प्रवाह घरात उतरणे, खांबात उतरणे असे प्रकार ग्रामीण भागात दरवर्षी ऐकावयास मिळतात तरीदेखील महावितरण कंपनीने परिसरातील जीर्ण झालेले खांब, विजेच्या तारा यांची दुरु स्ती केलेली नाही. याभागातील तारा व खांबांची दुरुस्ती करुन मिऊरवी अशाी मागणीशेतकºयांना करून मिळावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे दादाजी जाधव, उत्तम मोरे, राहुल सूर्यवंशी, रत्नाकर जाधव, नानाजी मोरे, दुर्गेश सूर्यवंशी, सुनील जाधव, रवींद्र वाघ, अमोल वाघ्रादींनी केली आहे.

Web Title: Sheep and two children were shocked by a broken wire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.