बळीराजाचे पावसासाठी साकडे
By Admin | Updated: July 15, 2014 00:51 IST2014-07-14T22:27:06+5:302014-07-15T00:51:46+5:30
बळीराजाचे पावसासाठी साकडे

बळीराजाचे पावसासाठी साकडे
सिन्नर : पावसाळा सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी लोटूनही पाऊस पडत नसल्याने वरुणदेवतेला प्रसन्न करण्यासाठी येथील भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात पर्जन्ययाग करून वरुणराजाला साकडे घालण्यात आले.
प्राणिमात्राचे संपूर्ण जीवन पाण्यावर अवलंबून आहे. निम्मा पावसाळा संपत आला तरी
पाऊस पडत नसल्याने सर्वत्र पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. जनावरांच्याही चाऱ्या-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. पाऊस पडावा म्हणून वैदिक काळापासून पर्जन्ययाग करण्याची परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर
येथील श्री स्वामी समर्थ सेवेकरी व ब्राह्मण पुरोहित संघातर्फे पर्जन्ययागाचे आयोजन करण्यात आले होते.
ह.भ.प. त्र्यंबकबाबा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ८ वाजता पर्जन्ययागास प्रारंभ झाला. येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात होमहवन करण्यात आले होते. भाविकांनी पर्जन्ययाग पूजेत भक्तिभावाने सहभागी होऊन पावसासाठी वरुणदेवतेला साकडे घातले.
होमहवन पूजेसाठी अशोक मुत्रक, विठ्ठल केदार, एकनाथ चव्हाण, भानुदास माळी, दत्तात्रय ढोली, रघुनाथ सोनार आदिंसह भाविक सपत्नीक सहभागी झाले होते. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मु.शं. गोळेसर, कृष्णाजी रंधे, मुरलीधर चव्हाण, शिवाजी वाजे, शांताराम जाधव, भाऊसाहेब कासार, उत्तमराव देशमुख, वसंत मुत्रक, लहानू गुंजाळ, अर्जुन गोजरे, सुधाकर जोशी, वसंत कासट, महावीर परदेशी, नारायण टाक, गोविंद कोरडे, रंगनाथ वाजे, ज्ञानदेव उगले, मुरलीधर चव्हाण यांनी याप्रसंगी भजनाचा कार्यक्रम केला. (वार्ताहर)