ति. झं. विद्यामंदिरात शालेय साहित्यवाटप
By Admin | Updated: July 19, 2014 01:05 IST2014-07-18T23:51:21+5:302014-07-19T01:05:45+5:30
ति. झं. विद्यामंदिरात शालेय साहित्यवाटप

ति. झं. विद्यामंदिरात शालेय साहित्यवाटप
भगूर : कॉँग्रेस व पालक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ति. झं. विद्यामंदिर शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा समिती प्रमुख श्रीरंग वैशंपायन होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भगूर कॉँग्रेस अध्यक्ष मोहन करंजकर, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर गायकवाड, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष निवृत्ती घुगे, भास्कर साळवे, मुख्याध्यापक यादव आगळे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते इयत्ता ५ वी ते ९ वी वर्गात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गरजू विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी अरूण चव्हाण, सुदर्शन गायकवाड, सचिन गायकवाड, शाम भोर, अजय करंजकर, तानाजी खैरे, नरेंद्र मोहिते, धनश्री धापेकर, लता भालेराव आदि उपस्थित होते. (वार्ताहर)