शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

वाढदिवसानिमित्त श्वानाला मिळाला सोन्याचा गोफ !

By श्याम बागुल | Published: December 02, 2018 5:37 PM

चेहेडीशिव भागातील रहिवासी व वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे श्वानप्रेमी रोहित राजपूत यांना बालपणापासून श्वानांची प्रचंड आवड व लळा असून, रोहित यांच्याकडे पहिले रॉकी नावाचे श्वान होते. रोहित याला सात वर्षांपूर्वी मित्रांनी वाढदिवसानिमित्त २ डिसेंबरला ‘ग्रेटडेन’ जातीचे आठ दिवसांचे श्वानाचे पिल्लू भेट दिले

नाशिक : आजच्या वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना तारेवरची कसरत करत संसाराचा गाडा हाकावा लागत आहे. मात्र दुसरीकडे चेहेडीशिव येथील श्वानप्रेमी रोहित राजपूत यांनी आपल्या पाळीव सात वर्षांच्या ‘भाऊ’ नामक श्वानाच्या वाढदिवसानिमित्त चक्क त्याला १३ तोळ्यांचा सोन्याचा गोफ भेट देऊन धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला.चेहेडीशिव भागातील रहिवासी व वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारे श्वानप्रेमी रोहित राजपूत यांना बालपणापासून श्वानांची प्रचंड आवड व लळा असून, रोहित यांच्याकडे पहिले रॉकी नावाचे श्वान होते. रोहित याला सात वर्षांपूर्वी मित्रांनी वाढदिवसानिमित्त २ डिसेंबरला ‘ग्रेटडेन’ जातीचे आठ दिवसांचे श्वानाचे पिल्लू भेट दिले. श्वानाशी खूप लळा असलेल्या रोहितने आठ दिवसांच्या त्या श्वानाच्या पिल्लाला मोठे केले. वाढदिवसानिमित्त मित्रांनी भेट दिलेल्या श्वानांचे त्याच दिवशी ‘रॉकी’ असे नामकरण केले. मात्र त्या श्वानाला सर्वजण ‘भाऊ’ म्हणू लागल्याने त्याचे नाव ‘भाऊ’ झाले. रोहितने आपल्या भाऊ श्वानांचा वाढदिवसदेखील स्वत:च्या वाढदिवसाच्या दिवशी साजरा करण्यास सुरुवात केली. भाऊचा प्रत्येक वाढदिवस रोहित त्याचे कुटुंबीय व मित्रपरिवार मोठ्या उत्साहाने साजरा करतात. यंदा रोहितने स्वत:च्या वाढदिवसाला स्वत:साठी काही न घेता लाडक्या भाऊ श्वानास सोन्याचा तेरा तोळ्यांचा गोफ बनवून त्याच्या गळ्यात अडकविला. भाऊ श्वानाच्या वाढदिवसानिमित्त रोहित मित्रांसह त्याला फिरविण्यासाठी रविवारी पनवेल जवळील कळंबोली येथे बहिणीच्या घरी घेऊन गेला. श्वानाचा वाढदिवस व त्यासाठी तेरा तोळे सोन्याचा गोफ तयार करणारा अवलिया विरळाच.चौकट====सारे काही श्वानासाठी...लाडक्या भाऊ श्वानासाठी स्वतंत्र खोली, बेड असून फिरण्यासाठी चारचाकी गाडी आहे. सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत सर्व ठिकाणी भाऊ श्वान सोबत असते. मुके श्वान असले तरी तो एक प्रकारे माझा ‘भाऊच’ आहे.- रोहित राजपूत, श्वानप्रेमी

टॅग्स :SocialसामाजिकNashikनाशिक