शताब्दी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा कालव्यात बुडून मृत्यू
By Admin | Updated: February 17, 2017 21:52 IST2017-02-17T21:45:19+5:302017-02-17T21:52:06+5:30
आगासखिंड : shaमित्रांसमवेत पोहोण्यासाठी गेला : पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला
शताब्दी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा कालव्यात बुडून मृत्यू
नाशिक : महाविद्यालयाजवळ असलेल्या कडवा कालव्यात मित्रांसह पोहोण्यास गेलेल्या शताब्दी महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़१७) दुपारच्या सुमारास घडली़ मयत विद्यार्थ्याचे नाव आकाश नंदू दरेकर (१९, डॉ़ घाडगे हॉस्पिटल मागे) असे असून, तो सातपूरच्या कामगारनगरमधील रहिवासी आहे़ दरम्यान, या घटनेची सिन्नर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़
सिन्नर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आगासखिंड येथील शताब्दी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशनच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थी आकाश दरेकर हा आपल्या दोघा मित्रांसह दुपारी २ वाजेच्या सुमारास महाविद्यालयाजवळील कडवा कालव्यात पोहोण्यासाठी गेले होते़ या कालव्याजवळ गेल्यानंतर हे तिघेही कालव्यात पोहोण्यासाठी उतरले, त्यापैकी दोन जण बाहेर आले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने आकाश हा पाण्यात बुडाला व त्याचा मृत्यू झाला़
महाविद्यालयाजवळील कडवा कालव्यात बुडालेल्या आकाशचा मृतदेह सुरुवातील सापडत नव्हता, मात्र त्यानंतर तो आढळून आला़