शरयूनगरवासीय बससेवेपासून वंचित
By Admin | Updated: November 25, 2015 23:29 IST2015-11-25T23:28:33+5:302015-11-25T23:29:28+5:30
शरयूनगरवासीय बससेवेपासून वंचित

शरयूनगरवासीय बससेवेपासून वंचित
इंदिरानगर : शरयूनगरमधील विद्यार्थी वर्ग आणि नागरिकांची अद्यापही बससेवेची गैरसोय होत आहे.
सुमारे दहा वर्षांपूर्वीचे वडाळा-पाथर्डी रस्त्यापासून सुमारे तीन किमी अंतरावर असलेले शरयूनगर आहे. ३०० कुटुंबीयांची १२०० ते १५०० नागरिकांची लोकवस्ती येथे आहे. महापालिकेच्या दोन प्रभागांतील हद्दीच्या वादामुळे दोघांनी केलेल्या दुर्लक्षामुळे शासकीय नोकरांच्या वसाहतीमधील मूलभूत समस्या विळख्यात सापडल्या आहे. यामध्ये शहर वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे.
परिसरातील शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी वर्ग शिक्षण घेण्यासाठी शहरात ये-जा करतात. या सर्वांना बससेवेचा लाभ घ्यावा लागतो. परंतु अद्यापपर्यंत शरयूनगरपर्यंत बससेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे सुमारे तीन किमी अंतर पायपीट करीत वेळेच्या आधी अर्धातास घरातून निघावे लागते. वडाळा-पाथर्डी रस्त्यावर पाथर्डी गावाकडे जाणारी बससेवा अपुरी पडत आहे. बसेस बहुतेक वेळेस न थांबताच निघून जातात. (वार्ताहर)