शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

नव्या सहकारी संस्थांना भागभांडवलांचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:36 IST

सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था संकल्पना पुढे आणली असून, या माध्यमातून नव्याने उदयास येऊ पाहणाऱ्या सहकारी संस्थांना किमान ५० लाख रुपयांचे भागभांडवल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल.

नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था संकल्पना पुढे आणली असून, या माध्यमातून नव्याने उदयास येऊ पाहणाऱ्या सहकारी संस्थांना किमान ५० लाख रुपयांचे भागभांडवल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल. जेणेकरून महिलांना रोजगार निर्मितीसाठी वाव मिळेल, असे प्रतिपादन राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी केले.  गंगापूररोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात कल्याणी महिला नागरी पतसंस्थेच्या वतीने आयोजित ‘श्रीमती कल्याणी’ पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी चरेगावकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने, सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, उपाध्यक्ष सुदर्शन भालेराव, जिल्हा महिला बँकेच्या अध्यक्ष शशीताई अहिरे, ‘भ्रमर’चे संपादक चंदुलाल शहा, डॉ. शरद महाले, गोपाळ पाटील आदि उपस्थित होते.यावेळी चरेगावकर म्हणाले, की महिला बचत गटांच्या माध्यमातून व्यवसायासाठी धाडस महिलांनी करणे गरजेचे आहे. व्यवसाय करण्यापूर्वी त्यामागील उद्देश, अर्थकारण, उत्पादन प्रक्रिया, आदि बाबींचा सखोल अभ्यास करावा, असा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना दिला.दरम्यान, मेळघाटमधील ‘संपूर्ण बांबू केंद्रा’च्या प्रमुख निरुपमा देशपांडे यांना ‘श्रीमती कल्याणी’हा द्वैवार्षिक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अकरा हजार रुपये रोख, सन्मानपत्र असे या पुरस्कारचे स्वरूप होते. यावेळी काही उत्कृष्ट महिला बचत गटांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अंजली पाटील यांनी केले. कल्पना चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.बांबू उद्योगाने अर्थकारण बळकटबांबू उद्योगामुळे मेळघाटला सकारात्मक ओळख मिळाली. सरकारी नोकरी वर पाणी सोडून मेळघाट गाठले. धारणी, चिखलदरा या भागात कामाला निरुपमा देशपांडे यांनी सुरुवात केले. तेथील लोकजीवन व त्यांची जगणे जवळून अनुभवत असताना त्यांच्यामधील कौशल्याला वाव देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यातूनच पुढे बचत गटांची स्थापना झाली आणि बांबू लागवडीला प्रचार-प्रसार केला. बांबूपासून वर्षभर उत्पादन मिळत असल्यामुळे हा व्यवसाय येथील रहिवाशांनी घरोघरी सुरू केला. परिणामी मेळघाटचे अर्थकारण बळकट होण्यास मदत झाल्याचे देशपांडे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक