शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विरोधापेक्षा कौतुकाचे  मोठेपण दाखवायला हवे :  शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 01:53 IST

विधिमंडळात काम करताना टीकेचे प्रसंग येतात, पण वेगळ्या विचाराच्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा आदर करायची वेळ येते तेव्हा त्यास विरोध करण्यापेक्षा त्याचे कौतुक करण्याचेही मोठेपण दाखविले पाहिजे.

नाशिक : विधिमंडळात काम करताना टीकेचे प्रसंग येतात, पण वेगळ्या विचाराच्या व्यक्तींच्या कर्तृत्वाचा आदर करायची वेळ येते तेव्हा त्यास विरोध करण्यापेक्षा त्याचे कौतुक करण्याचेही मोठेपण दाखविले पाहिजे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडून असे मोठेपण शिकण्यासारखे असून, यासाठी त्यांचे विचार अगोदर वाचले पाहिजेत, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांना उद्देशून केले.सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांना शरद पवार यांच्या हस्ते कार्यक्षम आमदार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी ते बोलत होते. शाल, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि ५१ हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे.  प. सा. नाट्यमंदिर येथे आयोजित या सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार अपूर्व हिरे, वाचनालयाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, देणगीदार डॉ. विनायक नेर्लीकर, डॉ. शोभा नेर्लीकर, किशोर पाठक, निवड समिती सदस्य शैलेंद्र तनपुरे उपस्थित होते.  यावेळी शरद पवार म्हणाले, विधिमंडळात अन्य सदस्य आहेत त्यांचा प्रत्येकाचा सन्मान राखला गेला पाहिजे. एखाद्याच्या कार्याचा गौरव करण्याची वेळ आली तर जरूर केले पाहिजे. इंदिरा गांधी सत्तेवर असताना भारत-पाकिस्तान युद्धात त्यांनी पाकिस्तानची धूळधाण केली होती.शहीद निनादची कन्या वेदिताला मदतपुरस्काराची ५१ हजारांची रक्कम आणि आपल्याकडील ५१ हजार रुपये अशी एक लाख रुपयांची मदत शहीद निनाद मांडवगणे यांची कन्या वेदिता हिच्या नावे करण्याची घोषणा यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. वाचनालयासाठी ५१ हजारांची आर्थिक मदतही त्यांनी यावेळी जाहीर केली.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेNashikनाशिक