शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 21:12 IST

Sharad Pawar: ट्रम्प यांची निती प्रत्येक वस्तूवर टॅक्स लावण्याची आहे. शेजारचे देश आपल्यासोबत नाहीत, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar: आपला पक्ष गांधी-नेहरु विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. जवाहरलाल नेहरु यांनी भारताला सावरायचे असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला बोलवायला हवे म्हणून यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत बोलवून घेतले होते. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी शपथ घेताच रात्री लगेच चीनने सैन्य मागे घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांना नाशिक जिल्ह्यातून खासदार म्हणून बिनविरोध पाठवले होते, असे शरद पवार यांनी सांगितले. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर नाशिकमध्ये होते. यावेळी उपस्थितांना शरद पवार यांनी संबोधित केले.  केंद्र सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. शेतीला भाव नाही. कांदा निर्यातीवर बंधने आहेत. एवढा मोठा जिल्हा असताना या शेतकऱ्यांची नाशिक जिल्हा बँक आजारी आहे. प्रचंड थकबाकी झाली आहे. केंद्रातील सत्ता ज्यांच्या हातात आहे, ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाहीत. त्यामुळे शेतकरी संघटना अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली. 

पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित

पाकिस्तान, नेपाळ अडचणीत आहे. बांगलादेश उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्या स्वातंत्र्यसाठी भारताने प्रयत्न केले होते. तो आपल्यासोबत नाही, श्रीलंका आपल्यासोबत नाही. देशाची धुरा पंतप्रधान मोदींच्या हातात आहे. त्यांनी आता परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित आहे. ट्रम्प यांची निती प्रत्येक वस्तूवर टॅक्स लावण्याची आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

दरम्यान, नाशिकच एक वैशिष्ट म्हणजे उत्तम शेती करणारा हा जिल्हा आहे. शेतीवर नाशिककरांचे लक्ष आहे. आधुनिक शेतीचा विचार करणारा हा शेतकरी आहे. नवनवीन प्रयोग इथ पाहायला मिळतात. कांद्याचे, सोयाबीनचे उत्पन्न करणारा जिल्हा म्हणजे नाशिक आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे, त्याला जोडधंदा हा दुधाचा आहे. शेतीतील गोष्टी आपण अमेरिकेकडून घ्यायला लागलो तर शेती अडचणीत येईल. राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत असेल तर अवघड आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. 

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसNashikनाशिक