शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी आणि नुकसान भरपाईसाठी सरकारकडे मागणी करणार, शरद पवार यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 18:10 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली नाशिकमधील नुकसानग्रस्त शेतांची पाहणी.

नाशिक- अवकाळी पावसामुळे शेतकाऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे, एकतर कर्ज काढून पीक घेतले आणि आता उभे असलेले पीक पूर्ण वाया गेले आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांनी पिके घेण्यासाठी घेतलेले कर्ज माफ करावे व झालेल्या पिकांची नुकसान भरपाई करावी, अशी मागणी आपण सरकारकडे करु, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  शरद पवार यांनी आज नाशिकमधील शेतकऱ्यांना दिली.वणी-कळवण रस्त्यावर शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी पवार यांनी केली, बाळू गांगोडे या शेतकऱ्याने सोयाबीनचे उद्धवस्त झालेले पीक भरल्या डोळ्याने पवार यांना दाखवताच उपस्थितांचे मन हेलावले, बाजरीच्या कणसांना फुटलेले कोंब, काळे पडलेले सोयाबीनच्या शेंगा, मनी गळून पडलेले द्राक्ष पाहून पवार यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी सवांद साधत तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांची साक्ष काढली, यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या साऱ्या व्यथा कथन करताना जिल्हा बँक, राष्ट्रीकृत बँक शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत, उलट बँकांनी सक्तीची वसुली सुरू केल्याचे सांगून बजावलेल्या नोटिसा दाखवल्या. ज्या शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ मिळाला व त्यांची नवे यादीत आले अशा शेतकऱ्यांना बँका नवीन कर्ज देण्यास दारा पुढे उभे करीत नसल्याचे सांगितले, तर पंचनामे करण्यासाठी आलेले तलाठी 30 टक्क्यांनी कमी नुकसान झाल्याचे पंचनामे करीत असल्याची तक्रार केली. यावेळी पवार यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून कळवण तालुक्यातील माहिती घेतली, गेल्या दोन दिवसात पंधरा टक्के पंचनामे झाल्याचे त्यांनी सांगितले, येत्या आढवड्यात पंचनामे पूर्ण झाले की त्याचा अहवालात पाठवण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली, त्यावर झालेले नुकसान खूपच आहे, आम्ही सरकारकडे ते मांडू पण तुम्हाला काय अपेक्षित आहे अशी विचारणा त्यांनी केली, त्यावर शेतकऱ्यांनी पिकांचे झालेले सर्व नुकसान मिळावे, कर्ज माफी व्हावी अशी मागणी केली,

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNashikनाशिकagricultureशेतीFarmerशेतकरी