सारदे ग्रामपंचायतीच्या वतीने मशालफेरी

By Admin | Updated: August 14, 2016 22:46 IST2016-08-14T22:42:15+5:302016-08-14T22:46:34+5:30

सारदे ग्रामपंचायतीच्या वतीने मशालफेरी

Sharad Mashalpari on behalf of Gram Panchayat | सारदे ग्रामपंचायतीच्या वतीने मशालफेरी

सारदे ग्रामपंचायतीच्या वतीने मशालफेरी


द्याने : आमचा गाव आमचा विकास या योजनेची माहिती देण्यासाठी सारदे ग्रामपंचायतीच्या वतीने मशालफेरीचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच जयश्री देवरे यांच्या हस्ते मशालफेरीचे उद्घाटन करण्यात आले.
शासनाची आमचा गाव आमचा विकास ही योजना राज्यभरात सुरू असून ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या ग्रामपंचायतीत आरोग्य शिक्षण व उपजीविका आणि मागसवर्गीयांच्या विकासासाठी नियोजित आराखडा तयार करणे, लोकसहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करणे हा उद्देश आहे. यावेळी सरपंच जयश्री देवरे उपसरपंच भरत देवरे ग्रामपंचायत सदस्य मंगलबाई देवरे , केवळबाई देवरे, डी. पी. देवरे , कैलास गायकवाड, अनिल देवरे, गीता सोनवणे, प्रवीण प्रशिक्षक, वैभव पाटील, ग्रामसेवक धीरज कापडणीस, आरोग्य सेवक, सेविका, मदतनीस, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Sharad Mashalpari on behalf of Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.