सार्थकनगर चौकाला वाहनथांब्याचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:13 IST2018-07-15T23:00:10+5:302018-07-16T00:13:08+5:30
इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील चर्चसमोरील चौकाला वाहनथांब्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने शालेय वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळा असून, शालेय वाहतूक करणारी वाहने रस्त्यावरच सार्थकनगर चौकात थांबत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.

सार्थकनगर चौकाला वाहनथांब्याचे स्वरूप
इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील चर्चसमोरील चौकाला वाहनथांब्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने शालेय वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळा असून, शालेय वाहतूक करणारी वाहने रस्त्यावरच सार्थकनगर चौकात थांबत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत विनयनगर, साईनाथनगर, इंदिरानगर, कलानगर, सार्थकनगर, सदिच्छानगर, पांडवनगरी, सराफनगर आदी उपनगरीय वसाहती आहेत. त्यामुळे वडाळा-पाथर्डी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. सार्थकनगर चौक धोकादायक बनला असून, या चौकात सातत्याने अपघात घडत आहेत. अनेकदा वाहतूक पोलिसांकडे तसेच इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या निदर्शनास ही बाब नागरिकांनी आणून दिली आहे; मात्र यावर कुठल्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच या रस्त्यालगत प्राथमिक माध्यमिक व महाविद्यालय असल्याने दिवसभर विद्यार्थी वर्गाची वर्दळ सुरू असते. सार्थकनगर बसथांब्यासमोरच प्राथमिक व माध्यमिक विद्यालय आहे. त्या चौकात सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाहनांची वर्दळ व विद्यार्थी-पालकांची गर्दी पहावयास मिळते.