शंकरनगर दगडफे क प्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल
By Admin | Updated: May 28, 2014 01:35 IST2014-05-27T23:40:25+5:302014-05-28T01:35:29+5:30
नाशिक : द्वारका परिसरातील शंकरनगरमध्ये दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या दगडफे क प्रकरणी संशयित अमर गांगुर्डेसह त्याच्या पंधरा साथीदारांविरुद्ध भद्रकाली पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे़ सोमवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास तीन इमारतींसह एका दुकानावर दगडफे क करण्यात आल्याची घटना घडली होती़

शंकरनगर दगडफे क प्रकरणी दंगलीचा गुन्हा दाखल
नाशिक : द्वारका परिसरातील शंकरनगरमध्ये दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या दगडफे क प्रकरणी संशयित अमर गांगुर्डेसह त्याच्या पंधरा साथीदारांविरुद्ध भद्रकाली पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे़ सोमवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास तीन इमारतींसह एका दुकानावर दगडफे क करण्यात आल्याची घटना घडली होती़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका पोलीस कर्मचार्याच्या दुचाकीस एका तरुणाचा धक्का लागल्याने त्यांच्यात बाचाबाची झाली़ गुलामअली अहमदअली आड्डर व त्याचा भाऊ युसूफ यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवल्याने दोघेही दुचाकीचालक निघून गेले़ टाकळीरोडवरील महंमद सोसायटीत राहणारे गुलामअली आड्डर यांचे सकिना कोल्ड्रिंक नावाचे दुकान आहे़ रात्री नऊ वाजेच्या सुमारास दहा-पंधरा जणांचे टोळके आड्डर यांच्या दुकानावर आले़
या टोळक्याने भांडणात मध्यस्थी का केली असा जाब विचारत गुलामअली आड्डर व त्यांचा भाऊ युसूफ यांना शिवीगाळ करून सकिना कोल्ड्रिंकवर दगडफे क केली़ यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता़ यानंतर या टोळक्याने महंमद सोसायटी गाठून तेथील रॉयल हाईट्स, गुरुदेव, राधा रेसिडेन्सी या इमारतींवरही दगडफे क केली़ यामध्ये इमारतीच्या खिडक्यांच्या काचा तसेच दोन वाहनांचे नुकसान झाल्याचेही वृत्त आहे़
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ, सहायक पोलीस आयुक्त पंकज डहाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील हे फ ौजफ ाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.या प्रकरणी गुलामअली अहमदअली आड्डर यांनी दिलेल्या फि र्यादीनुसार संशयित अमर दिलीप गांगुर्डेसह त्याच्या १० ते १५ साथीदारांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांचा शोध सुरू असून, काहींना ताब्यात घेण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)