शंकराचार्य न्यासाच्या बालाजी मंदीरामध्ये ‘ब्रम्होत्सव’

By Admin | Updated: October 1, 2016 21:31 IST2016-10-01T21:31:01+5:302016-10-01T21:31:01+5:30

सोमेश्वर धबधब्याजवळ असलेले शंकराचार्य न्यासाच्या बालाजी मंदीरामध्ये ‘ब्रम्होत्सव’ सुरू झाला आहे.

Shankaracharya's 'Brahmotsav' in Balaji Mandir of Nyas | शंकराचार्य न्यासाच्या बालाजी मंदीरामध्ये ‘ब्रम्होत्सव’

शंकराचार्य न्यासाच्या बालाजी मंदीरामध्ये ‘ब्रम्होत्सव’

 ऑनलाइन लोकमत 

नाशिक, दि. १ - येथील सोमेश्वर धबधब्याजवळ असलेले शंकराचार्य न्यासाच्या बालाजी मंदीरामध्ये ‘ब्रम्होत्सव’ सुरू झाला आहे. यानिमित्त मंदीरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे मंदीर उजळून निघाले आहे. 
शनिवारी (दि.१) पहाटे न्यासाचे प्रमोद भार्गवे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. येत्या पंधरा तारखेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 
यामध्ये  महापूजा, ध्वजपूजन, तुलसी अर्चना, कुंकुम अर्चना, महालक्ष्मी मंदीर वस्त्र अर्पण, हिरण्य अर्चना, पुष्पार्चना, कल्याणम् (बालाजी विवाह) बुधवारी (दि.१२) सकाळी आठ वाजता मंजिरी असनारे-केळकर यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम होणार आहे.

Web Title: Shankaracharya's 'Brahmotsav' in Balaji Mandir of Nyas