शंकर महाराजांची पालखी उत्साहात

By Admin | Updated: December 5, 2015 22:47 IST2015-12-05T22:47:02+5:302015-12-05T22:47:49+5:30

शंकर महाराजांची पालखी उत्साहात

Shankar Maharaj's palanquin enthusiasm | शंकर महाराजांची पालखी उत्साहात

शंकर महाराजांची पालखी उत्साहात

नाशिक : पुण्यातील धनकवडी येथील सद्गुरू श्री शंकर महाराज यांच्या पालखीची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मुंबई नाका ते कपालेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आलेली ही पालखी मिरवणूक शनिवारी दुपारी कापड बाजारातील विठ्ठल मंदिरात नेण्यात आली. तेथून सटाणा तालुक्यातील अंतापूर येथे पालखी नेण्यात येणार आहे.
धनकवडी येथील भक्तांच्या वतीने ही पालखी काढण्यात आली आहे. नाशिकमध्ये शुक्रवार (दि.४) मुंबई नाका येथील साखला मॉल येथील औदुंबर भक्त मंडळाच्या वतीने ही मिरवणूक काढण्यात आली.
प्रारंभी अभिषेक आणि आरती केल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सायंकाळी मिरवणूक निघाली. शालिमार चौक, मेनरोड, बोहरपट्टीमार्गे मुरलीधर मंदिर आणि तेथून कपालेश्वर मंदिरात पालखी नेण्यात आली. दरम्यान, शनिवारी (दि. ५) पहाटे ५ वाजता रामकुंड येथे पादुकांना स्रान घालून, तसेच अभिषेक करून शंकर महाराजांची पालखी मुरलीधर मंदिर येथे दर्शनासाठी ठेवण्यात आली होती.
पालखी मार्गावरील शेकडो भाविकांनी पादुकांचे दर्शन घेतले. मिरवणुकीत भूषण काळे, मयूर नवाळे, किरण चौधरी, नीलेश शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर, पदाधिकारी आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Shankar Maharaj's palanquin enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.