शंकरबाबा महाराजांच्या पादुकांचे स्वाग
By Admin | Updated: November 16, 2014 01:59 IST2014-11-16T01:58:30+5:302014-11-16T01:59:39+5:30
शंकरबाबा महाराजांच्या पादुकांचे स्वाग

शंकरबाबा महाराजांच्या पादुकांचे स्वाग
तााशिक : धनकवडी (पुणे) येथून निघालेल्या शंकरबाबा महाराजांच्या पादुकांचे दुपारी मुंबई नाक्यावर आगमन झाले़ या पादुकांची शहरातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली़ रविवार दुपारपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी या पादुका शहरात असणार असून, सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही पालखी अंतापूरला रवाना होणार आहे़
दरवर्षी शंकरबाबा महाराज पादुका पालखी पुणे येथून अंतापूरला जाते़ नाशिकमार्गे जात असलेल्या या पालखीची भक्तांकडून शहरात सवाद्य मिरवणूक काढण्यात येते़ पुणे येथून ७ नोव्हेंबरपासून निघालेल्या या पालखीचे शनिवारी शहरात आगमन झाले़ या पालखीची दत्तात्रय दादा जगताप यांच्या हस्ते पूजा करण्यात आली़ यांनतर कालिका मंदिराजवळील दत्तमंदिरापासून पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली़ या पालखीच शहरात ठिकठिकाणी रांगोळ्या काढून व पूजा करण्यात आली़ जुने नाशिक परिसरातील नामदेव विठ्ठल मंदिरात या पादुका रविवारी दुपारी पाच वाजेपर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी ठेवल्या जाणार असून, यानंतर पालखी सोहळा अंतापूरकडे रवाना होणार आहे़ या पालखीमध्ये दत्तात्रय दादा जगताप, नीलेश शिंदे, रामेश्वर जंगम, भूषण काळे, मनोज जंगम, सिद्धेश विसपुते, सुनीलशेठ सुगंधी, दीपक चव्हाण आदिंसह भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)