शालिमार चौकात तरुणावर धारदार शस्त्राने वार

By Admin | Updated: May 20, 2017 17:08 IST2017-05-20T17:08:23+5:302017-05-20T17:08:23+5:30

दोनशे रुपयांची खंडणी दिली नाही या कारणावरून तरुणावर धारदार शस्त्राने वार

Shalimar Chowk with sharp weapon warrant | शालिमार चौकात तरुणावर धारदार शस्त्राने वार

शालिमार चौकात तरुणावर धारदार शस्त्राने वार

नाशिक : दोनशे रुपयांची खंडणी दिली नाही या कारणावरून तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (दि़१९) सायंकाळच्या सुमारास शालिमार चौकातील नेपाळी कॉर्नरला घडली़
भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी संदीप हाबुसिंग जाधव (वय २२, कुंभारवाडा, जुने नाशिक) हा सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास महेक कलेक्शनसमोर वस्तुविक्री करीत असताना संशयित प्रितेश बळीराम चव्हाण (रा़ काझी गढी, जुने नाशिक) याने शिवीगाळ व दमदाटी करून २०० रुपयांची मागणी केली़ पैसे देण्यास नकार दिल्याने संशयित चव्हाण याने जाधवच्या उजव्या हातावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले़
या प्रकरणी एका संशयितावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Shalimar Chowk with sharp weapon warrant