वेळापूरच्या सरपंचपदी शकुंतला कराटे
By Admin | Updated: August 27, 2016 22:23 IST2016-08-27T22:22:57+5:302016-08-27T22:23:10+5:30
पोटनिवडणूक : ‘शेतकरी विकास’ची बाजी

वेळापूरच्या सरपंचपदी शकुंतला कराटे
लासलगाव : निफाड तालुक्यातील वेळापूरच्या आरक्षित सरपंचपदासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत शेतकरी विकास पॅनलच्या शकुंतला
खंडू कराटे यांची वर्णी लागली. त्यांचा तेरा मतांनी विजय झाला.
वेळापूरचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असून, तत्कालीन सरपंच पार्वताबाई पवार या पंचवार्षिक निवडणुकीत बिनविरोध निवड होऊन सरपंचपदी विराजमान झाल्या होत्या. मात्र कागदपत्रांच्या फेरफार प्रकरणी चौकशीनंतर त्यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्यामुळे गत वर्षभर सरपंचपद रिक्त होते. प्रभारी सरपंच म्हणून नारायण पालवे हे कामकाज पाहत होते. वेळापूर ग्रामपंचायतीच्या ३६० मतदार असलेल्या वॉर्ड क्र मांक २ मधील या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात येऊन बुधवारी
(दि. २४) मतदान घेण्यात आले.
या पदावर शेतकरी विकास पॅनलच्या शकुंतला कराटे यांची वर्णी लागली. निकाल जाहीर होताच समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. शेतकरी विकासच्या या विजयासाठी राजेंद्र पालवे, अशोक पालवे, संतोष शिंदे, संतोष कुटे, विजय पालवे, निलेश पालवे, लक्ष्मण शिंदे, नितीन पालवे, नारायण कुटे, योगेश पालवे, प्रकाश पालवे, किशोर कुटे, गणेश फड, शिवाजी राजोळे, विक्र म शिंदे, संजय पालवे, राहुल शिंदे, पोपट राजोळे, ज्ञानेश्वर गरुड, मंगेश राजोळे, संतोष गरु ड, सौरव कुटे, नाना गरु ड, प्रसाद पालवे, दीपक गरुड, नाना बदामे, अमोल पालवे, विक्र म कुटे, दगडू शिंदे, नंदू पवार, गोरख शिंदे, भिकन वीसे, संतोष गाढे, गणेश पालवे यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)