देवळा येथे शाकंभरी पौर्णिमा उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 02:14 PM2019-01-21T14:14:52+5:302019-01-21T14:15:49+5:30

देवळा : येथील ग्रामदैवत दुर्गामाता मंदिरात शाकंभरी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.

 Shakambhari Purnima festival at Deola | देवळा येथे शाकंभरी पौर्णिमा उत्सव

देवळा येथे शाकंभरी पौर्णिमा उत्सव

Next

देवळा : येथील ग्रामदैवत दुर्गामाता मंदिरात शाकंभरी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या काळात पंढरपुर येथील कु. अनुराधा दिदी यांच्या भागवत कथांचा लाभ भाविकांना घेतला. स्वर्गीय शिवानंद महाराज यांच्या प्रेरणेतून २३ वर्षांपूर्वी दुर्गामाता मंदीरात शाकंभरी पौर्णिमा उत्सव सुरू करण्यात आल्यानंतर दरवर्षी नियमितपणे साजरा केला जात आहे. उत्सव काळात शोभायात्रा, नवचंडीयाग, भागवत कथा आदी कार्यक्र म झाले. शोभायात्रेने उत्सवास प्रारंभ होउन अखेरच्या दिवशी महाप्रसादाने उत्सवाची सांगता करण्यात येते. ह्या दिवशी १२७ प्रकारचा भाजीपाला जमा करून त्याची एकत्रित भाजी करण्यात येते. यासाठी भक्त मंडळी संपूर्ण भारतातून विविध प्रकारच्या भाज्या, रानभाज्या, कंदमुळे जमा करून आणतात. यात अनेक दुर्मिळ भाज्यांचा समावेश असतो. ह्या तयार केलेल्या भाजीचा महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पंचक्र ोशीतील हजारो नागरिक तसेच महिला दरवर्षी येत असतात. शाकंभरी पौर्णिमेचा साजरा केला जाणारा हा उत्सव जिल्हाभर प्रसिद्ध झाला असून जिल्हाभरातून असंख्य भाविक हया उत्सवाला हजेरी लावतात. उत्सवाचे आयोजन ग्रामस्थ, व सत्संग सेवा समिती यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title:  Shakambhari Purnima festival at Deola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक