शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

हरसूलच्या कन्या छात्रालयाला शाहू छत्रपती पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2020 01:08 IST

नाशिक : पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने दिला जाणारा राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथील विश्व हिंदू परिषद आणि वनवासी व दुर्बल घटक विविध सेवा प्रकल्प न्यास संचलित कन्या छात्रालयाला प्रदान करण्यात आला आहे.

ठळक मुद्देडेक्कन एज्युकेशन : एक लाखांचा धनादेश प्रदान

नाशिक : पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्यावतीने दिला जाणारा राजर्षी शाहू छत्रपती पुरस्कार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथील विश्व हिंदू परिषद आणि वनवासी व दुर्बल घटक विविध सेवा प्रकल्प न्यास संचलित कन्या छात्रालयाला प्रदान करण्यात आला आहे.डेक्कन एज्युकेशन सोसायटी चे प्रथम अध्यक्ष राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रतिवर्षी शिक्षण, विज्ञान, पर्यावरण, सामाजिक कार्य, महिला सक्षमीकरण या क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या राष्ट्रीय स्तरावरील नामवंत व्यक्ती किंवा संस्था यांचा सन्मान या पुरस्काराने केला जातो. यंदाचा पुरस्कार कन्या छात्रालयाला प्राप्त झाला आहे. १ लाख रु पये रोख, प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत शाहू छत्रपती होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्सिस्टन्स सिस्टिम लिमिटेड चे संस्थापक अध्यक्ष डॉ. आनंद देशपांडे उपस्थित होते. यावेळी डॉ. देशपांडे यांनी पुरस्काराच्या रकमेव्यतिरिक्त आणखी एक लाख रु पयांचा धनादेश संस्थेला देण्याचे जाहीर केले. कार्यक्र मास संस्थेच्या नियामक मंडळ आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, फर्गसनचे प्राचार्य डॉ. रविंद्रसिंह परदेशी, कन्या छात्रालयाचे अध्यक्ष राजेश रत्नपारखी, सचिव अ‍ॅड. विनित महाजन, कोषाध्यक्ष प्रा. हेरंब गोविलकर, छात्रालय पालक पदाधिकारी अ‍ॅड. श्याम घरोटे उपस्थित होते.इन्फोआॅनलाइन सोहळापुरस्कार वितरण सोहळा आॅनलाइन पध्दतीने संपन्न झाला. गेल्या ३९ वर्षांपासून ह्या छात्रालयाच्या माध्यमातून ७०० हून अधिक वनवासी क्षेत्रातील विद्यार्थिनींना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांचे संगोपन करण्यात आले आहे. कन्या छात्रालयाचे अध्यक्ष राजेश रत्नपारखी यांनी छात्रालयाच्या स्थापने पासूनची माहिती दिली तर सचिव अ‍ॅड. विनित महाजन यांनी भावी प्रकल्पांची माहिती दिली. 

 

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरSchoolशाळा